शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प सरकारच्या नव्या व्हिसा धोरणाचा फटका; लहान मुले, ज्येष्ठांना मुलाखतीला हजेरी गरजेची

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 13:02 IST

व्हिसा प्रक्रियेतील प्रतीक्षा कालावधी लक्षणीय वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने नॉन-इमिग्रंट श्रेणीतील व्हिसा अर्जदारांसाठी मुलाखतीसंदर्भात लागू असलेल्या सूट धोरणात मोठा बदल जाहीर केला. हे नवीन नियम २ सप्टेंबरपासून लागू होणार आहेत. याअंतर्गत १४ वर्षांखालील मुलांना आणि ७९ वर्षांवरील नागरिकांनाही दूतावासातील  अधिकाऱ्यांसमोर प्रत्यक्ष मुलाखतीला हजर राहावे लागेल. 

यापूर्वी या वयोगटांना मुलाखतीपासून सूट मिळत होती. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने या बदलामागे सुरक्षेचे कारण दिले आहे. त्यामुळे व्हिसा प्रक्रियेतील प्रतीक्षा कालावधी लक्षणीय वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कोणत्या व्हिसा प्रकारांवर परिणाम?

हा बदल बी-१/बी-२ पर्यटक व व्यावसायिक व्हिसा, विद्यार्थी व्हिसा (एफ आणि एम), कामगार व्हिसा (एच-१बी) आणि विनिमय कार्यक्रमासाठीचा जे व्हिसा या सर्व नॉन-इमिग्रंट श्रेणीतील व्हिसावर लागू होईल. मात्र, राजनैतिक व्हिसा (ए आणि जी श्रेणी) याप्रमाणे काही विशिष्ट प्रकारांना यामधून सूट देण्यात येणार आहे.

नूतनीकरणासाठी आता अडथळे 

पूर्वी, ज्या अर्जदारांचा व्हिसा मागील ४८ महिन्यांत संपुष्टात आला होता, त्यांना पुन्हा व्हिसा नूतनीकरण करताना मुलाखतीची गरजभासत नव्हती. आता ही कालमर्यादा १२ महिन्यांपर्यंतच मर्यादित करण्यात आली आहे. परिणामी, एच-१बी व एफ-१ व्हिसाधारकांनाही याचा फटका बसेल.

सध्याच्या सवलती

नवीन नियमांनुसार, काही मोजक्याच श्रेणींना मुलाखतीपासून सूट मिळेल : राजनैतिक व्हिसाधारक (ए-१, ए-२, जी-१ ते जी-४, नाटो, ई-१) सवलतीसाठी अटी ज्या देशात वास्तव्यास आहात तेथूनच अर्ज सादर करावा लागेल. पूर्वी व्हिसा नाकारण्यात आले असल्यास, त्याबाबत माहिती द्यावी लागेल. त्यातून सूट मिळाल्यास तिचा तपशीलही सांगावा लागेल. सवलत असली, तरी अंतिम निर्णय  अधिकाऱ्याच्या अधिकारात राहील. 

 

टॅग्स :AmericaअमेरिकाVisaव्हिसाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प