शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

Donald Trump : "देव माझ्यासोबत होता, म्हणूनच मी तुमच्यासमोर उभा आहे"; हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 10:24 IST

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रथमच जनतेला संबोधित केलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपण शानदार विजय मिळवू, असंही ते म्हणाले.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर प्रथमच जनतेला संबोधित केलं. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत आपण शानदार विजय मिळवू, असंही ते म्हणाले. ट्रम्प यांनी गुरुवारी विस्कॉन्सिनच्या मिलवोकीमध्ये रिपब्लिकन नॅशनल कन्वेन्शनमध्ये भाग घेतला. ट्रम्प यांनी अधिकृतपणे रिपब्लिकन पक्षाकडून उमेदवारी स्वीकारली. यावेळी त्यांनी राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, "आजपासून चार महिन्यांनंतर आपल्याला मोठा विजय मिळेल." त्यांनी वचन दिलं की ते केवळ अर्ध्या देशासाठी नव्हे तर संपूर्ण अमेरिकेसाठी राष्ट्राध्यक्ष असतील. त्यांच्यावरील हल्ल्याचा संदर्भ देत ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली. रक्त वाहत होतं, पण कुठेतरी मला सुरक्षित वाटत होतं कारण देव माझ्यासोबत होता असं सांगितलं. ."मी जर शेवटच्या क्षणी मान हलवली नसती, तर गोळी निशाण्यावरच लागली असती आणि आज रात्री मी तुमच्यासोबत नसतो. सर्वशक्तिमान देवाच्या कृपेने मी तुमच्यासमोर उभा आहे. अनेक लोक म्हणतात की, तो एक महत्त्वपूर्ण  क्षण होता. आम्ही या आठवड्याच्या परिषदेत दैवी हस्तक्षेपाविषयी ऐकले, जेव्हा स्पीकर्सनी गोळीबारावर चर्चा केली. मी येथेही अशाच विषयावर चर्चा करत आहे."

"मी अर्ध्या अमेरिकेचा नव्हे तर संपूर्ण अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होण्याच्या रेसमध्ये आहे, कारण अर्धी अमेरिका जिंकण्यात कोणताच विजय नाही" असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. त्यांनी सीक्रेट सर्व्हिस एजंट्सचे आभार मानले. अद्भुत लोक असं म्हणत एजंट्सचे वर्णन केलं आहे. तसेच त्यांनी मोठा धोका पत्करला आणि जीव वाचवल्याचं देखील सांगितलं.  

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका