भारताने रशियाकडून तेल खरेदी न थांबवल्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अखेर भारतावर टॅरिफ बॉम्ब टाकला. ट्रम्प यांनी भारतावर २५ टक्के टॅरिफ लावणार असल्याचे ३० जुलै रोजी जाहीर केले होते. भारताने तेल खरेदी न थांबवल्याने त्यांनी यात भरपूर वाढ करणार असल्याचे म्हटले होते. ट्रम्प यांनी २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ भारतावर लावला आहे. कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरीही केली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावण्याच्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्याने हा निर्णय घेतला असल्याचे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे.
आधी २५ टॅरिफ आणि दंड
३० जुलै रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्यास भारतीय वस्तूंवर २५ टक्के टॅरिफ आणि दंडही आकारणार असल्याचे जाहीर केले होते. पण, भारताने अमेरिकेला उत्तर दिले. त्यानंतर रशियानेही ट्रम्प यांना सुनावले. त्यामुळे बिथरलेल्या ट्रम्प यांनी भारतावर आणखी जास्त टॅरिफ लावणार असल्याचे मंगळवारी म्हटले होत. त्यानंतर त्यांनी आता तब्बल २५ टक्के म्हणजे दुप्पट टॅरिफ भारतावर लादला आहे.
टॅरिफ कधीपासून होणार लागू?
अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी केलेल्या आदेशानुसार, टॅरिफ लागू करण्याचा हा निर्णय २१ दिवसांच्या आत लागू होईल. म्हणजे २७ ऑगस्टपासून भारतातून अमेरिकेत निर्यात केल्या जाणाऱ्या वस्तूंवर टॅरिफचा निर्णय लागू होईल.
वाचा मुद्द्याची गोष्ट >>टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
ज्या वस्तू २७ ऑगस्टपूर्वी पाठवल्या गेल्या असतील आणि १७ सप्टेंबर २०२५ पूर्वी अमेरिकेमध्ये पोहचतील, त्यांच्यावर हा निर्णय लागू असणार नाही. या वस्तूंना या टॅरिफमधून सवलत दिली मिळणार आहे. हा टॅरिफ इतर सर्व शुल्क आणि टॅक्स वगळून अतिरिक्त असेल आणि काही विशेष प्रकरणातच त्यात सूट दिली जाऊ शकते, असेही या आदेशामध्ये म्हटले गेले आहे.