आता चर्चेसाठी उशीर झालाय! इराणची वायुसेना आणि नौसेना संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 20:32 IST2026-03-03T20:31:48+5:302026-03-03T20:32:32+5:30

४९ इराणी नेते संपवले! ट्रम्प यांनी अमेरिकन सैन्याच्या सर्वात भीषण हल्ल्याचा केला उलगडा

Donald trump Claims Iran Air Force Navy and Leadership Are Totally Destroyed | आता चर्चेसाठी उशीर झालाय! इराणची वायुसेना आणि नौसेना संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

आता चर्चेसाठी उशीर झालाय! इराणची वायुसेना आणि नौसेना संपवल्याचा ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

Donald Trump: इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्धाने चौथ्या दिवशी अत्यंत भीषण वळण घेतले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत इराणच्या लष्करी शक्तीबाबत मोठा दावा केला आहे. "इराणची हवाई संरक्षण यंत्रणा , वायुसेना, नौसेना आणि त्यांचे नेतृत्व आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहे. ते आता चर्चेसाठी विनवणी करत आहेत, पण आता खूप उशीर झाला आहे," अशा शब्दांत ट्रम्प यांनी इराणला सुनावले आहे.

ट्रम्प यांचा ४ आठवड्यांचा प्लॅन

डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की, अमेरिकन सैन्याने इराणला प्रचंड नुकसान पोहोचवले आहे. सुरुवातीच्या हल्ल्यात राजकीय आणि लष्करी क्षेत्रातील ४९ बड्या इराणी नेत्यांचा खात्मा केल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे. "आम्ही अजून पूर्ण ताकदीने हल्ला केलेला नाही. युद्धाचा सर्वात तीव्र टप्पा येणे अजून बाकी आहे," असा इशारा त्यांनी दिला. युद्ध जास्त काळ खेचण्याची इच्छा नाही, साधारण ४ आठवड्यांत इराणचा धोका पूर्णपणे संपवला जाईल, असे ट्रम्प म्हणाले.

इराणची भूमिका, सन्मानाने चर्चेसाठी तयार

दुसरीकडे, अयातुल्ला खामनेई यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी चर्चेची दारे उघडी असल्याचे संकेत दिले आहेत. इराण सन्मानाने वाटाघाटी करण्यास तयार आहे, मात्र ही चर्चा कोणत्याही दबावाखाली नसावी. अमेरिकेच्या पूर्वीच्या कारवायांमुळे विश्वासाला तडा गेला आहे. संवाद हा शांततेसाठी असावा, अटी लादण्यासाठी नसावा, असे त्यांनी स्पष्ट केले.

"आम्ही अमेरिका किंवा व्हाईट हाऊसवर क्षेपणास्त्रे डागली का?"

इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बगाएई यांनी अमेरिकेचे दावे फेटाळून लावत उलट सवाल केला. "इराण अमेरिकेसाठी धोका कसा असू शकतो? आम्ही काय अमेरिकेच्या किनाऱ्यावर सैन्य पाठवले आहे का? आम्ही व्हाईट हाऊसवर क्षेपणास्त्रे डागली आहेत का? इराणच्या चारही बाजूंना शेकडो अमेरिकन लष्करी तळ असणे ही इराणची चूक आहे का?" असे सवाल त्यांनी उपस्थित केले.

युद्धाची भीषणता आणि जीवितहानी

या संघर्षात आतापर्यंत सहा अमेरिकन सैनिक मारले गेल्याची पुष्टी अमेरिकेने केली आहे. तर इराणी रेड क्रिसेंट सोसायटीच्या मते, इराणमध्ये मृतांचा आकडा ५०० च्या वर गेला आहे. इराणने बहरीन, जॉर्डन, कुवेत, कतार आणि युएईवर केलेले मिसाइल व ड्रोन हल्ले हे अमेरिकेसाठी सर्वात मोठे आश्चर्य ठरले आहेत.

अमेरिकेत राजकीय मतभेद

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या या भूमिकेला रिपब्लिकन नेत्यांनी पाठिंबा दिला असला तरी, डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते चक श्यूमर यांनी याला निवडक युद्ध म्हटले आहे. प्रशासनाने दिलेली माहिती अपुरी असल्याचे सांगत त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणावर टीका केली आहे.

Web Title: Donald trump Claims Iran Air Force Navy and Leadership Are Totally Destroyed