शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प काही केल्या ऐकेना; आता पुन्हा म्हणाले- "मीच भारत-पाकिस्तान युद्ध थांबवलं..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 07:56 IST

Donald Trump India Pakistan War Ceasefire: यावेळी तर ट्रम्प यांनी एकाच दिवसात दोनदा हा दावा केला आहे

Donald Trump India Pakistan War Ceasefire: भारत आणि अमेरिका यांच्यात आर्थिक स्तरावर काही काळ तणावाची स्थिती होती. या काळात दोन्ही देशांमधील राजकीय संबंधही काहीसे बिघडले होते. पण दोन दिवसांपूर्वी भारत आणि अमेरिका यांच्यात एक व्यापार करार करण्यात आला. त्यानंतर दोन्ही देशांमधील संबंध सुधरण्यास सुरुवात झाली. पण तशातच आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याचा दावा केला. एकाच दिवसात चक्क दोन वेळा त्यांनी या दावयाचा पुनरुच्चार केला. याआधी ट्रम्प यांनी जेव्हा जेव्हा असा दावा केला, त्यावेळी भारताने हा दावा फेटाळून लावला आहे. तरीही डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र सातत्याने याचा उल्लेख सुरुच ठेवला आहे.

एका दिवसात दोन वेळा दावा

डोनाल्ड ट्रम्प यांनी आतापर्यंत सुमारे ९० पेक्षा जास्त वेळा दावा केला आहे की त्यांनी भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष संपवला. तशातच आता एका कार्यक्रमात बोलताना ट्रम्प म्हणाले, "एका वर्षात मी आठ भयानक युद्धे संपवली आहेत. त्यात कंबोडिया आणि थायलंड, कोसोवो आणि सर्बिया, पाकिस्तान आणि भारत, इस्रायल आणि इराण आणि आर्मेनिया आणि अझरबैजान यांच्यातील युद्धांचा समावेश आहे." नंतर, ट्रुथ सोशलवरील एका पोस्टमध्ये, डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमधील अणुयुद्ध रोखल्याचा दावा पुन्हा केला.

भारताने प्रत्येक वेळी दावा फेटाळून लावला

गेल्या वर्षी १० मे रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आधी युद्धबंदीची घोषणा केली. तेव्हापासून अमेरिकेच्या मध्यस्थीने रात्रीच्या दीर्घ चर्चेनंतर भारत आणि पाकिस्तानने पूर्ण आणि तात्काळ युद्धबंदीवर सहमती दर्शविली, असे ते सतत दावा करताना दिसतात. अमेरिका आणि जगभरातील विविध व्यासपीठांवर ते सतत हा दावा वारंवार पुन्हा करतात. पण भारताने मात्र हे दावे प्रत्येकवेळी फेटाळून लावले आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चर्चेत मध्यस्थाची गरज नाही, असे भारताने अनेकदा ठणकावले आहे.

अमेरिका जगातील सर्वात शक्तिशाली

"अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश आहे. माझ्या पहिल्या कार्यकाळात, मी सैन्याची पूर्णपणे पुनर्बांधणी केली, ज्यामध्ये नवीन आणि अनेक अद्ययावर अण्वस्त्रांचा समावेश होता. मी अंतराळ दलाची स्थापना देखील केली आणि आता पुन्हा एकदा सैन्याची पुनर्रचना केली जात आहे. अमेरिका आता आयोवा, मिसूरी, अलाबामा सारख्या युद्धनौका उतरवत आहे, ज्या दुसऱ्या महायुद्धात समुद्रात असलेल्या युद्धनौकांपेक्षा १०० पट अधिक शक्तिशाली आहेत," असे सांगत डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धसज्जता दाखवून दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump repeats India-Pakistan war claim despite Indian denials.

Web Summary : Donald Trump has repeatedly claimed to have stopped the India-Pakistan war, even boasting about preventing a nuclear conflict. India has consistently refuted these claims, asserting no need for mediation. Trump also highlighted America's military strength.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानwarयुद्धAmericaअमेरिकाUSअमेरिका