शहरं
Join us  
Trending Stories
1
मातृभाषेसोबतच आणखी एक भारतीय भाषा शिकवा; यूजीसीचं सर्व राज्यांना पत्र, नियमावली जारी
2
काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3
आजचे राशीभविष्य, ०८ डिसेंबर २०२५: आपण केलेल्या कामातून यश अन् कीर्ती लाभ होईल
4
इंडिगोवर मोठा आर्थिक दंड लावा; डीजीसीए आणि कंपनीच्या प्रमुखांना हटवा
5
यंदा अनावश्यक गर्दी टाळणार, आजपासून हिवाळी अधिवेशन, प्रशासन सज्ज : सभापती, उपसभापतींनी घेतला आढावा
6
देशातील सर्वांत मोठी एअरलाइन का डगमगली?; नवीन नियमांमुळे संकट! कमी कर्मचारी मॉडेलचाही फटका
7
विमानसेवाच जमीनदोस्त ! अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू, प्रवाशांचे हाल
8
विरोधी पक्षनेतेपद मुद्यावरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; ‘मविआ’ला खुर्चीचीच चिंता असल्याची सरकारची टीका
9
महाराष्ट्रात लवकरच येणार ‘मेडिकल व्हॅल्यू टुरिझम’ योजना, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची माहिती
10
विमानतळावर इंडिगोने स्थापन केला आपत्ती व्यवस्थापन गट; अडथळ्यांबाबत २४ तासांत स्पष्टीकरण देण्याची नोटीस
11
क्रिकेटपटू स्मृती मानधना अन् पलाशचे लग्न अखेर माेडले; कुटुंबांच्या गोपनीयतेचा आदर करा : स्मृती
12
...ये दोस्ती हम नही तोडेंगे ! मोदी आणि पुतीन यांच्या भेटीकडे अमेरिका, युरोप आणि चीनचेही होते लक्ष
13
आजी-आजोबांच्या ‘स्क्रीन’च्या ‘व्यसनां’चं काय करणार?
14
गोव्यात नाइट क्लब ठरला ‘मृत्यू क्लब’; अग्नितांडवात २५ ठार; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
15
गोवा नाइट क्लबमध्ये कशामुळे भडकली आग? 25 जणांच्या मृत्यूला कोण जबाबदार? CM सावंत यांचा मोठा खुलासा, 4 जणांना अटक
16
Bigg Boss 19: गौरव खन्नाने करुन दाखवलं! 'बिग बॉस १९'च्या ट्रॉफीवर कोरलं नाव
17
गोवा क्लबला दोन एक्झिट गेट, बाहेर पडण्यासाठी धडपडत होते लोक; यामुळे झपाट्याने पसरली आग
18
नाईट क्लब पाडण्याचे आदेश रद्द करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई; गोव्यातील दुर्घटनेनंतर पंचायत संचालकासह तिघे निलंबित
19
'बिग बॉस १९'मधून तान्या मित्तलचा प्रवास संपला; प्रणित मोरेची टॉप ३ मध्ये एन्ट्री, ट्रॉफी जिंकणार?
20
मुंढवा जमीन व्यवहार प्रकरण: शीतल तेजवानीनंतर रवींद्र तारूला अटक, घरातून घेतलं ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

अफगाण महिलांनी अमेरिकेवर विश्वास ठेवला, पण ट्रम्प यांनी धोका दिला...! आता सुरू आहे मोठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 16:59 IST

या महिला तालिबान राजवटीतून पळून ओमानमध्ये उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या...

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एका निर्णय ८० हून अधिक अफगाण महिलांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी विश्वासघाता केल्याची या महिलांची भावना आहे. जगभरात महिलांच्या हक्कांसंदर्भात भाष्य करणार्या अमेरिकन प्रशासनाने, आता या महिलांना तालिबानच्या भयावह राजवटीत परतण्यास भाग पाडले आहे. या महिला तालिबान राजवटीतून पळून ओमानमध्ये उच्च शिक्षणासाठी गेल्या होत्या. मात्र, ट्रम्प प्रशासनाने परदेशी मदत कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात केल्यानंतर, आता या महिलांना अफगाणिस्तानात परत पाठवण्याची तयारी सुरू आहे.

मुलींची शिष्यवृत्ती रोखली - डोनाल्ड ट्रम्प जानेवारी महिन्यात सत्तेवर आले. यानंतर, त्यांनी निधी रोखण्याचा निर्णय घेतल्यानंतर, यूएस एजन्सी फॉर इंटरनॅशनल डेव्हलपमेन्टकडून (USAID) निधी पुरवल्या जाणाऱ्या या अफगाण महिलाची शिष्यवृत्ती अचानक बंद करण्यात आली. भीती मुळे नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका विद्यार्थिनीने बीबीसीसोबत बोलताना सांगितले की, हे हृदयद्रावक आहे. सर्वजण काळजीत आहेत आणि रडत आहेत. दोन आठवड्यांच्या आता परत पाठवले जाईल, असे आम्हाला सांगण्यात आले आहे.

सुमारे चार वर्षांपूर्वी ऑगस्ट २०२१ मध्ये सत्तेत आल्यापासून तालिबानने महिलांवर कठोर निर्बंध लादले आहेत. महिलांचा शिक्षणाचा अधिकार काढून घेण्यात आला आहे. या काळात, USAID कार्यक्रमांतर्गत संरक्षण मिळालेल्या अनेक अफगाण महिला देश सोडून पळून गेल्या. मात्र, आता व्हाईट हाऊसने परदेशी मदत कार्यक्रम बंद करण्याच्या आणि अब्जावधी डॉलर्सच्या निधीत कपात करण्याचा निर्णय घेतल्याने जगभरातील मानवतावादी कार्यक्रमांना मोठा धक्का बसला आहे.

अफगान महिलांकडून मदतीचं आवाहन -आपल्याला अफगाणिस्तानात परत पाठवम्याची तयारी सुरू असल्याचे ओमानमध्ये शिक्षण घेत असलेल्या अफगाण महिलांचे म्हणणे आहे. त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला त्वरित हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले आहे. यासंदर्भात, यूएसएआयडीचा निधी संपल्याने शिष्यवृत्ती थांबवण्यात आली असल्याचे संबंधित महिलांना ई-मेल द्वारे करळवण्यात आले आहे. 

टॅग्स :WomenमहिलाAfghanistanअफगाणिस्तानAmericaअमेरिका