शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
3
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
4
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
5
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
6
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
7
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
8
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
9
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
10
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
11
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
12
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
13
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
14
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
15
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
16
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
17
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
18
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
19
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
20
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...

आॅफिसच्या मीटिंगमध्ये स्मार्टफोन वापरता? मग हे जरूर वाचा...

By admin | Updated: April 12, 2015 01:11 IST

तुम्ही कंपनीच्या, आॅफिसच्या मिटिंगमध्ये स्मार्टफोन बाहेर काढता तेव्हा तुम्ही तुमचे बॉस आणि सहकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरता.

वॉशिंग्टन : तुम्ही कंपनीच्या, आॅफिसच्या मिटिंगमध्ये स्मार्टफोन बाहेर काढता तेव्हा तुम्ही तुमचे बॉस आणि सहकाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरता. हे कुणाचे वैयक्तिक मत नाही तर विद्यापीठाने (युनिव्हर्सिटी आॅफ साऊथर्न कॅलिफोर्निया) केलेले हे सर्वेक्षण आहे. मार्शल स्कूल आॅफ बिझिनेसने या मनोरंजक, पण तेवढ्याच महत्त्वाच्या विषयावर सर्वेक्षण करताना ४० वर्षांवरील संबंधितांची मते जाणून घेतली आहेत. ज्यांचा पगार ३० हजार डॉलर्सपेक्षा अधिक आहे, अशा ५५४ पूर्ण वेळ व्यावसायिकांचे हे सर्वेक्षण आहे. विशेष म्हणजे यात अशाच लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत, ज्या कंपन्यांमध्ये ५० पेक्षा अधिक कर्मचारी काम करतात. त्यांना मिटिंग व स्मार्टफोनबाबत अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि त्यातून अनेक गमतीदार उत्तरे आली. मीटिंगमध्ये स्मार्टफोन वापरणे अयोग्य आहे, असे यशस्वी लोकांना का वाटते? भर मीटिंगमध्ये तुम्ही फोन बाहेर काढता तेव्हा इतरांना जे वाटते, ते असे-४सन्मानाचा अभाव : तुम्ही मीटिंगमध्ये असताना तुमच्यासमोर चाललेल्या चर्चेपेक्षा फोनवरील माहिती तुम्हाला जास्त महत्त्वाची वाटते. तुमच्या समोर बसलेल्यांपेक्षा फोनवर बोलणारी व्यक्ती तुमच्यासाठी जास्त महत्त्वाची आहे.४दुसऱ्यांच्या हातचे बाहुले : तुम्ही नव्या जमान्यातील पॅव्हलोव्हियन कुत्र्यासारखे आहात. हे कुत्रे प्रशिक्षित असतात व दुसऱ्याच्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद देण्याचे त्यांना शिकवले जाते, तसेच कुणीही, कोणत्याही वेळी (मीटिंगमध्येही) फोन केला तरी तो घेता.४लक्ष नाही : तुम्ही एका वेळी एकाच विषयावर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थ आहात.४आत्मभान नाही : मीटिंग चालू असताना फोन घेणे म्हणजे इतरांशी कसे वागत आहात, हे कळतही नाही.४सामाजिक भान नाही : तुमच्या अशा वागण्याने इतरांवर काय परिणाम होतो, हेही तुम्हाला कळत नाही....अन्यथा स्मार्टफोन जमा करावे लागतील४विशेष म्हणजे मिटिंग आणि स्मार्टफोनबद्दल आपण इतरांकडून जशा वागण्याची अपेक्षा करतो, आपण तसे वागतो का, हेही प्रत्येकाने तपासून पाहिले पाहिजे. अन्यथा मिटिंग रूमच्या बाहेर एक बास्केट ठेवून त्यामध्ये सर्वांचे स्मार्टफोन जमा करावे लागतील, अशी वेळ येणे फार दूर नाही.