शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

माघार घेऊ नका, लढतच राहा; स्वत:चा जीव वाचवण्यासाठी बगदादीची अतिरेक्यांना चिथावणी

By admin | Updated: November 4, 2016 06:19 IST

इराकमधील मोसूल शहरात इसिससविरुद्ध सुरू असलेली लढाई आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्टपणे दिसत असून, इसिसचा म्होरक्या असलेल्या अबू बक्र अल बगदादीला इराकी फौजांनी घेरले

बगदाद : इराकमधील मोसूल शहरात इसिससविरुद्ध सुरू असलेली लढाई आता शेवटच्या टप्प्यात पोहोचल्याचे स्पष्टपणे दिसत असून, इसिसचा म्होरक्या असलेल्या अबू बक्र अल बगदादीला इराकी फौजांनी घेरले आहे. चहुबाजूंनी कोंडी झालेली असतानाही बगदादीने अल फुरकान मीडियाच्या माध्यमातून एक ध्वनिफित प्रसारित करून आपल्या समर्थकांना ‘‘माघार घेऊ नका, चिवटपणे लढा द्या आणि लढतच राहा,’’ असा संदेश दिला आहे. आपल्या क्रूर कारवायांनी जगभरात दहशत पसरवणाऱ्या इसिसने इराक आणि सीरियात आपले बस्तान बसवले होते. मात्र इसिसचा बालेकिल्ला असलेल्या मोसूल शहरावरही इराकी फौजांनी चाल करत या शहराला वेढा घातला आहे. त्यामुळे इसिसची नाकेबंदीच झाली आहे. तिथे इराकी फौजा आणि इसिसच्या दहशतवाद्यांमध्ये तुंबळ लढाई सुरू आहे. त्यातच बगदादीला इराकी फौजांनी पूर्णपणे घेरल्याच्या बातम्या आल्या आहेत. त्यामुळे दहशतवाद्यांच्या लढ्यावरच त्याचे अस्तित्व अवलंबून असल्याचे दिसत आहे. म्हणूनच त्याने हा संदेश प्रसारित केला असावा, असे बोलले जात आहे. मात्र त्याने आता कितीही प्रयत्न केले तरीही गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेला बगदादीचा क्रूर खेळ संपुष्टात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (वृत्तसंस्था)>क्रूरकर्मा बगदादी वर्षभराने काय बोलला?कोणत्याही परिस्थितीती माघार घेऊ नका. आत्मसन्मानाने तुमच्या भूमीवर टिकून राहा. असे करणे हे हजार वेळा लाजिरवाण्या पद्धतीने माघार घेण्यापेक्षा अधिक महत्त्वाचे असते. निनेवाहमधील नागरिकांनी, विशेषत: दहशतवाद्यांनी स्वत:मध्ये कोणत्याही प्रकारची दुर्बलता न आणता शत्रूचा सामना करावा.