शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

अमेरिकेच्या व्हिसासाठी फिंगरप्रिंट स्कॅनिंग गरजेचं आहे का? त्यासाठी नेमकं कुठे जावं लागेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 6:23 AM

व्हिसासाठी अर्ज करताना फिंगरप्रिंट स्कॅनिंग आवश्यक असतं का?

प्रश्न- फिंगरप्रिंटची नोंद करण्याचं ठिकाण बदलल्याचं ऐकलं. मी फिंगरप्रिंटची नोंद करणं गरजेचं आहे का? त्यासाठी कुठे जावं लागेल?उत्तर- होय, 14 वर्षांखालील आणि 79 वर्षांवरील व्यक्ती वगळता व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या सर्वांना व्हिसाच्या मुलाखतीआधी फिंगरप्रिंटची नोंद करावी लागते. स्टुडंट किंवा टुरिस्ट असे नॉन इमिग्रंट प्रकाराचे व्हिसा असो किंवा इमिग्रंट व्हिसा असो, फिंगरप्रिंट स्कॅनिंग आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला बायोमॅट्रिक अपॉईंटमेंट घ्यावी लागते. त्या ठिकाणी तुमच्या हाताचे ठसे आणि फोटो घेतला जातो. यासाठीच्या अपॉईंटमेंटसाठी www.usatraveldocs.com/in या संकेतस्थळाला भेट द्या. परिनी क्रेसेन्झो, 101, पहिला मजला, ए विंग, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा पूर्व येथे नवं व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटर आहे. हे सेंटर मुंबईतील दूतावासाच्या जवळ आहे. बायोमेट्रिक अपॉईंटमेंटसाठी किंवा पासपोर्ट घेऊन जाण्यासाठी मुंबईतील अ‍ॅप्लिकेशन सेंटरची निवड करणाऱ्यांना या नव्या ठिकाणी जावं लागेल. तुम्ही भारतातील कोणत्याही व्हिसा अ‍ॅप्लिकेशन सेंटरवर (व्हिएसी) जाऊन फिंगरप्रिंट स्कॅनिंगची प्रक्रिया पूर्ण करू शकता. तुम्ही व्हिसा मुलाखतीच्या 45 दिवस आधी व्हिएसीमधून अपॉईंटमेंट घेऊ शकता. मात्र अनेकजण दूतावासातील मुलाखतीच्या एक दिवस अगोदर फिंगरप्रिंट स्कॅनिंग पूर्ण करतात. ज्या दिवशी तुम्ही बायोमेट्रिकसाठी अपॉईंटमेंट घेतली आहे, त्या दिवशी व्हिएसीमध्ये या. त्यावेळी सोबत कन्फर्मेशन लेटर आणि व्हिसासाठी आवश्यक कागदपत्रं सोबत आणा. ही प्रक्रिया अतिशय सोपी असते. यात तुमचा फोटो काढला जातो आणि तुमच्या हातांची दहा बोटं स्कॅन केली जातात. ही प्रक्रिया डिजिटल असल्यानं ती अतिशय पटकन होते. तुमच्या अर्जावरील माहिती योग्य आहे का, तुम्ही आवश्यक कागदपत्रं आणली आहेत का, याची पडताळणी बायोमेट्रिक अपॉईंटमेंट दरम्यान करण्यात येते. यामुळे व्हिसा मुलाखतीसाठी अपॉईंटमेंट घेताना जास्त वेळ जात नाही. व्हिसा मुलाखतीदरम्यान तुमचे फिंगरप्रिंट आणि फोटो यांची पडताळणी होते. यामधून योग्य व्यक्तीच मुलाखतीला आली आहे ना, याची खात्री पटते.  

टॅग्स :USअमेरिकाAmericaअमेरिकाVisaव्हिसा