दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2025 11:10 IST2025-12-23T11:09:11+5:302025-12-23T11:10:40+5:30
dipu chandra das mob lynching : संबंधित फॅक्ट्री व्यवस्थापनाने वेळीच पोलिसांना माहिती दिली असती तर, कदाचित दीपूचा जीव वाचला असता...

दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
बांगलादेशातील मयमनसिंह जिल्ह्यात २७ वर्षीय दीपूचंद्र दास (वय २७) नावाच्या एका हिंदू फॅक्टरी कामगार तरुणाची धर्मांध जमावाने अतीशय निर्घृनपणे हत्या केल्यानंतर, सातत्याने नव नवे खुलासे होताना दिसत आहेत. ईशनिंदेच्या केवळ संशयावरून या हिंदू तरुणाचे 'मॉब लिंचिंग' झाले. खरे तर, इस्लामिक कट्टरपंथी धर्मांध सैतानांनी केलेली ही निर्घृण हत्या म्हणजे, मानुसकीलाच काळिमा फासणारी घटना आहे. तपासातून अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक वास्तव समोर येत आहे. संबंधित फॅक्ट्री व्यवस्थापनाने वेळीच पोलिसांना माहिती दिली असती तर, कदाचित दीपूचा जीव वाचला असता.
व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात -
महत्वाचे म्हणजे, या घटनेच्या तपासात फॅक्टरी व्यवस्थापनाची भूमिका संशयाच्या घेऱ्यात आली आहे. प्राथमिक तपासानुसार, ज्यावेळी दीपूवर इशनिंदेचे आरोप झाले, त्याचवेळी व्यवस्थापनाने पोलिसांना बोलावून त्याला संरक्षण दिले असते, तर कदाचित परिस्थिती वेगळी राहिली असती, त्सुयाची जीवही वाचला असता. मात्र व्यवस्थापनाने त्याला संरक्षण न देता जबरदस्तीने त्याचा राजीनामा घेतला आणि त्याला बाहेर दबा धरून बसलेल्या धर्मांध सैतानांच्या स्वाधीन केले.
सहकाऱ्यांनीच धोका दिला...!
धक्कादायक गोष्ट म्हणजे, दीपू सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनीच त्याला धोका दिला. दीपूला मारहाण करणाऱ्या जमावात तेही सामील झाले. अत्यंत वेदनादायक गोष्ट म्हणजे, त्या सैतानांच्या जमावाने दीपूची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह एका झाडाला लटकवून पेटवून दिला.
ईशनिंदा केल्याचा कुठलाही पुरावा नाही -
यासंदर्भात बोलताना, दीपूने ईशनिंदा केल्याचा कुठलाही पुरावा अद्याप मिळालेला नाही, प्रत्यक्षदर्शींनी अशा कोणत्याही आक्षेपार्ह विधानाची पुष्टी केलेली नाही. तसेच, सीसीटीव्ही फुटेज आणि चौकशीवरून असे दिसून येते की, ही घटना पूर्वनियोजित होती, फॅक्ट्री सुपरवायझर्सनी दीपूला जबरदस्त राजीनामा देण्यास भाग पाडले. यानंतर त्याला सैतानी जमावाच्या स्वाधीन करण्यात आले. यानंतर, त्या जमावाने त्याची हत्या केली. यानंतर त्याला झाडाला लटकवून, त्यावर ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आले. यावेळी कट्टरपंथी सैतान त्याच्याभोवती जल्लोष करत घोषणाबाजी करत होते, असे 'रॅपिड ॲक्शन बटालियन'ने (RAB) आणि तपास अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात आतापर्यंत १२ जणांना अटक करण्यात आली आहे.