शहरं
Join us  
Trending Stories
1
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
2
Latest Marathi News LIVE Updates: केंद्रीय कायदामंत्र्यांनी लोकसभेत सादर केले सीमांकन विधेयक; संसदेत गदारोळ
3
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
4
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
5
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
6
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
7
१७३ वर्षांपूर्वी प्रथम धावली, ४०० जणांचा प्रवास; आजही सेवेत, भारतीय रेल्वेची ‘ती’ ट्रेन कोणती?
8
विराट कोहली सामना संपल्यावर स्वत:हून LSGचे मालक संजीव गोयंकांना भेटायला गेला, फोटो VIRAL
9
अक्षय्य तृतीयेपूर्वीच सोन्या-चांदीच्या दरात सातत्यानं तेजी; पाहा काय आहेत २४k, 22k, 18k सोन्याचा लेटेस्ट भाव
10
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
11
'प्रताप सरनाईक माझे ड्रायव्हर असते'; मेहतांच्या विधानाने वाद, सरनाईक म्हणाले, "दुर्लक्ष करतोय पण..."
12
स्टार क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा! महिला अत्याचाराच्या आरोपाखाली जाऊन आलाय तुरुंगात
13
करण-तेजस्वीचं झालंय 'सीक्रेट वेडिंग?' सोशल मीडियावर चर्चा; अखेर अभिनेत्याने सोडलं मौन
14
Middle East Conflict: अमेरिकेचा कठोर निर्णय! जागतिक तेल पुरवठा विस्कळीत होण्याची भीती, भारतासाठीही धोक्याची घंटा
15
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
16
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
17
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
18
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
19
Share Market Today: तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात, Sensex ४०० अंकांनी तर Nifty मध्ये १५० अंकांची तेजी, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या भीतीने दाऊदने तळ बदलला

By admin | Updated: May 21, 2014 11:25 IST

१९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमने मोदींना घाबरुन कराचीतील आपला तळ बदलून अफगाण -पाक सीमेवरील एका गावात मुक्काम हलवला आहे.

नवी दिल्ली : नरेंद्र मोदी सत्तेवर येणार हे नक्की होताच, पाकिस्तानच्या पोटात मात्र भीतीचा गोळा येत असल्याची चिन्हे आहेत. त्याची सुरुवातच १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी व आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिमने कराचीतील आपला तळ बदलल्याच्या वृत्ताने झाली असून, तो अफगाण -पाक सीमेवरील एका गावात गेला आहे. नरेंद्र मोदी आता पंतप्रधानपदी येणार हे नक्की झाल्यानंतर, भाजपा नेता नितीन गडकरी यांचा पाकिस्तानी सुरक्षा विश्लेषक तारीक पीरजादा यांच्याशी वाद झाला. त्यानंतर भारत-पाक यांच्या संबंधातल्या विविध बातम्या प्रसिद्ध झाल्या. या तणावाच्या पार्श्वभूमीवर दाऊदने कराची येथील आपला तळ हलविण्याचा निर्णय घेतला. दाऊद पाकिस्तानातच आहे अशी भारताची खात्री असताना पाकिस्तान मात्र हात वर करण्याचीच भूमिका निभवत आला आहे. भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत दाऊदवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे ते सत्तेवर आल्यानंतर दाऊदवर कारवाई होणार, असे मानले जात आहे. गुप्तचर विभागाच्या एका अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार कदाचित गुप्तचर विभागाचे माजी प्रमुख अजित डोभाल यांची दाऊदवर कारवाई करण्यासाठी मदत घेतली जाण्याची शक्यता आहे. अशा कारवाईसाठी त्यांची ख्याती आहे. माजी गृहसचिव व बिहारचे खासदार आर के सिंग यांचीही या कामी सरकारकडून मदत घेतली जाईल, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे मोदींच्या राज्यात दाऊदवर कारवाई होईल, असेच संकेत आहेत.

मोदींच्या शपथविधीसाठी नवाझ शरीफांना निमंत्रण

नरेंद्र मोदी २६ मे रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेणार असून या शपथविधी सोहळ्यासाठी सार्कमधील देशांच्या राष्ट्रप्रमुखांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. निमंत्रितांमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचाही समावेश आहे. शरीफ निमंत्रण स्वीकारुन मोदींच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहतील का याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे.