मासे पकडताना अचानक समोर आली मगरी, पाहा धडकी भरवणारा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:42 IST2021-08-16T15:36:11+5:302021-08-16T15:42:17+5:30
Viral video of crocodile : महिलेचे नशीब चांगले म्हणून त्या मगरीने तिच्यावर हल्ला केला नाही.

मासे पकडताना अचानक समोर आली मगरी, पाहा धडकी भरवणारा व्हिडिओ
आयुष्यात कधी काय होईल हे कुणालाच माहित नाही. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये अशीच एक घटना घडली आहे. एक महिला तिच्या काही मित्रांसह मासे पकडण्यासाठी गेली होती. मासे पकडत असताना, अशी घटना घडली, जी पाहून त्यांना धक्काच बसला.
अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणारी एक महिला तिच्या काही मित्रांसह फिरायला गेली होती. यावेळी ती आणि तिचे मित्र एका तलावाजवळ मासे पकडण्यासाठी थांबले. त्या महिलेचा मित्र फिशिंग रॉड(मासे पकडण्याची काठी)ने मासे पकडत होता आणि ती या मासेमारीचा व्हिडिओ शूट करत होती.
व्हिडिओ शूट करण्यासाठी ती पाण्याच्या अगदी जवळ गेली होती. यावेळी अचानक पाण्यातून एक मगर बाहेर आली. पाण्यामध्ये शेवाळ आणि कचरा जास्त असल्यामुळे मगर बाहेर येईपर्यंत कुणालाच त्या मगरीबद्दल कल्पना नव्हती. त्या मगरीला पाहून महिलेला मोठा धक्का बसला. मगरीला पाहताच महीला पाण्यापासून लांब गेली. रागात असलेली ही मगर पाण्यामध्ये एखाद्या दैत्यापेक्षा कमी दिसत नव्हती. त्या महिलेचे नशीब चांगले म्हणून त्या मगरीने तिच्यावर हल्ला केला नाही. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.