शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील पवित्र नात्याला तडा देणारा संतापजनक प्रकार समोर आला. एका २६ वर्षीय महिला शिक्षिकेने तिच्या १६ वर्षीय विद्यार्थ्याला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अनेक वर्षे त्याच्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. हे प्रकरण अमेरिकेतील मिशिगन राज्यातील वॉटरफोर्ड येथील आहे. ओक्साइड प्रेप अकादमीमध्ये शिकवणाऱ्या २६ वर्षीय माजी शिक्षिका जोसेलिन सॅनरोमनवर एका विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवल्याचा गंभीर आरोप आहे.
सॅनरोमन पोंटियाकची रहिवासी आहे. ही कथित घटना २०२३ मध्ये घडली, जेव्हा सॅनरोमन वॉटरफोर्ड टाउनशिपमधील ओक्साइड प्रेप अकादमीमध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होती. ही शाळा डेट्रॉईट शहराच्या वायव्येस सुमारे ३० मैल अंतरावर आहे. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, सॅनरोमनने तिच्या एका सहकाऱ्याला लैंगिक संबंधांबद्दल सांगितले, त्यानंतर हा प्रकार उजेडात आला. सॅनरोमनवर थर्ड डिग्री क्रिमिनल सेक्सुअल कंडक्ट अंतर्गत आरोप लावण्यात आले आहेत, ज्यात दोषी आढळल्यास तिला तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
ओकलंड काउंटीचे सरकारी वकील करेन डी. मॅकडोनाल्ड म्हणाले की, "सॅनरोमन ओक्साइड प्रेप अकादमीमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत असताना २०२३ पहिल्यांदा विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवले. त्यानंतर अनेकदा तिने विद्यार्थ्यासोबत लैंगिक संबंध ठेवले, जे कायद्याने बेकायदेशीर आहेत. मिशिगनमध्ये शिक्षक आणि विद्यार्थ्यामधील असे कोणतेही संबंध गुन्हा मानले जातात. विद्यार्थ्यी अल्पवयीन नसला तरी हा गुन्हा आहे. कोणत्याही शाळेतील कर्मचारी, शिक्षक असो वा प्रशिक्षक, जर त्याने विद्यार्थ्याशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला तर तो गुन्हा आहे. सॅनरोमनने अल्पवयीन विद्यार्थ्याचे शोषण करून तिच्या पदाचा विश्वासघात केला. मी त्या शिक्षिकेचे कौतुक करतो ज्यांनी हे प्रकरण उजेडात आणण्याचे धाडस दाखवले."
ओक्साइड प्रेप अकादमीने या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कारवाई केली आणि सॅनरोमन हिला नोकरीवरून काढून टाकले. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देतो. आम्ही या प्रकरणात अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करत आहोत आणि तपासात सर्वतोपरी मदत करू, असे निवेदन शाळा प्रशासनाने जारी केले.