coronavirus: Wuhan becomes coronavirus free, last three patients discharged from hospital | coronavirus: वुहान झाले कोरोनामुक्त, शेवटच्या तीन रुग्णांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज

coronavirus: वुहान झाले कोरोनामुक्त, शेवटच्या तीन रुग्णांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज

बीजिंग - जगभरात कोरोना विषाणूच्या संसर्गाचे केंद्र बनलेले चीनमधील वुहान शहर आता जवळपास कोरोनामुक्त झाल्याचे वृत्त आहे. चीनमध्ये कोरोनाच्या संसर्ग झालेल्या शेवटच्या तीन रुग्णांनीही कोरोनावर मात केली असून, आता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच वुहानमधील तब्बल एक कोटी लोकांची चाचणी केल्यानंतर आता शहरात कोरोनाचा एकही नवा रुग्ण सापडलेला नाही.

दरम्यान, चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बाहेरून आलेल्या पाच जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. यामधील चार जण हे शांघाईमधील आहेत. तर एक जण हा सिचुआन प्रांतामधील आहे. तसेच गुरुवारी लक्षणे दिसत नसलेले तीन रुग्ण सापडले आहेत. त्यानंतर अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या २९७ झाली आहे. या सर्व रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

गुरुवारपर्यंतच्या आकडेवारीनुसार चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेल्यांचा एकूण आकडा ८३ हजार ०२७ एवढा झाला असून, त्यापैकी ६६ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर ७८ हजार ३२७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे ४ हजार ६३४ जणांचा मृत्यू झाला आहे.  

सरकारी वृत्तपत्र असलेल्या पीपल्स डेलीने दिलेल्या वृत्तानुसार शुक्रवारी वुहानमधील शेवटचे तीन संक्रमित रुग्णही बरे झाले आहेत. तसेच त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी बुधवारी समोर आलेल्या आकडेवारीनुसार वुहानमध्ये अजूनही २४५ जणांना कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. मात्र त्यांच्यामध्ये कुठलीही लक्षणे दिसून आलेली नाहीत.  

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: चिंताजनक! कोरोनाचा ग्रामीण भागातही फैलाव; काही राज्यांत शहरांपेक्षा गावात अधिक रुग्ण

२६ व्या वर्षी खासदार, ४५ व्या वर्षी मुख्यमंत्री! अशी आहे योगी आदित्यनाथ यांची कारकीर्द

कोरोना आला, वादळ झाले, आता आकाशातून पृथ्वीवर येणार तिहेरी संकट

coronavirus: कोरोनामुळे तिजोरीत खडखडाट; मोदी सरकारकडून नव्या योजनांना मार्च २०२१ पर्यंत स्थगिती

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: Wuhan becomes coronavirus free, last three patients discharged from hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.