CoronaVirus: चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात होऊ शकतो तब्बल दीड कोटी लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2020 04:39 PM2020-03-09T16:39:41+5:302020-03-09T16:45:02+5:30

Corona Virus News: कोरोना विषाणूबाबत संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारा एक अहवाल समोर आला आहे.

CoronaVirus: Worrying! Corona can cause up to 1.5 billion deaths worldwide BKP | CoronaVirus: चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात होऊ शकतो तब्बल दीड कोटी लोकांचा मृत्यू

CoronaVirus: चिंताजनक! कोरोनामुळे जगभरात होऊ शकतो तब्बल दीड कोटी लोकांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे जगभरात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूमुळे मानवजातीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी या विषाणूमुळे जगभरात सुमारे दीड कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतोकोरोना विषाणूच्या फैलावामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होणार

मेलबर्न - चीनमधून सुरुवात होऊन हळुहळू  जगभरात पसरत चाललेल्या कोरोना विषाणूमुळे मानवजातीसमोर गंभीर संकट उभे राहिले आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणामुळे जगभरात आतापर्यंत ३८०० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. चीनपाठोपाठ इराण आणि इटलीमध्ये कोरोनाचा कहर दिसून येत आहे. दरम्यान, कोरोना विषाणूबाबत संपूर्ण जगाला चिंतेत टाकणारा एक अहवाल समोर आला आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरी या विषाणूमुळे जगभरात सुमारे दीड कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो, अशी भीती या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे.

ऑस्ट्रेलियन नॅशनल विद्यापीठाने संशोधन करून हा अहवाल तयार केला आहे. कोरोना विषाणूमुळे मानव जातीसमोर उदभवलेल्या गंभीर संकटासोबतच या विषाणूमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवरही गंभीर परिणाम होणार असल्याची भीती या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे.

कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या जीवितहानीबाबत या अहवालामधून धक्कादायक शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातून पुरेसे प्रयत्न झाले नाहीत तर येत्या काही वर्षांत जगभरात मिळून ६ कोटी ८० लाख लोकांचा मृत्यू होईल. या विषाणूमुळे चीन आणि भारतातील लाखो लोकांचा मृत्यू होईल. तर अमेरिकेमध्येसुद्धा दोन लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो. त्याशिवाय ब्रिटनमध्ये ६४ हजार, जर्मनीमध्ये ७९ हजार  आणि फ्रान्समध्ये ६० हजार लोकांचा या विषाणूमुळे मृत्यू होऊ शकतो, अशी भीती या अहवालामधून व्यक्त करण्यात आली आहे. तसेच दक्षिण कोरिया आणि इटलीमध्येसुद्धा हजारो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो, असे या अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, कोरोना विषाणूचा फटका जगभरातील अर्थव्यवस्थेलाही बसणार आहे. कोरोना विषाणूमुळे उत्पादन मंदावले आहे. त्यामुळे जागतिक जीडीपी २.३ ट्रिलियन डॉलरपर्यंत जाऊ शकतो. अमेरिकेच्या जी़डीपीमध्ये दोन टक्क्यांनी तर ब्रिटनच्या जीडीपीमध्ये २.३ टक्क्यांनी घट होऊ शकते. कोरोना विषाणूमुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये सातत्याने घसरण होत आहे.

संबंधित बातम्या

IPL 2020 : आयपीएलचे सामने 'याचि देही याचि डोळा' पाहण्याचे दिवस विसरा, फ्रँचायझींचा मोठा निर्णय?

100 वर्षीय वृद्धाची कोरोनावर मात, रुग्णालयातून डिस्चार्ज घेऊन पोहोचले घरात

Coronavirus : कोरोना व्हायरसबाबतच्या १० खोट्या गोष्टी, जाणून घ्या त्यांचं सत्य....

चीननंतर इटलीमध्ये कोरोनाचा कहर काढू लागला असून तिथे 400 हून जास्त नागरिक संक्रमित झाले आहेत. तर उद्रेक रोखण्यासाठी अनेकांना घरातच राहण्याचे सांगण्यात आले आहे. भारतातही कोरोनाने संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली असून केरळमध्ये एका तीन वर्षांच्या बालकालाही लागण झाल्याचे समोर आले आहे. केरळच्या एर्नाकुलम येथे सोमवारी एका 3 वर्षाच्या मुलालाही कोरोना विषाणूची लागण झाल्याच समोर आले आहे. या मुलाचे कुटुंबीय नुकतेच इटलीहून परतले होते. या बालकाला एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये आतापर्यंत ९ जण संक्रमित आहेत. 

Web Title: CoronaVirus: Worrying! Corona can cause up to 1.5 billion deaths worldwide BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.