शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Coronavirus: फेस मास्कसंदर्भात WHOच्या नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर, आता दिल्या अशा सूचना

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 03, 2020 10:04 AM

जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी फेस मास्क वापरासंदर्भातील नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर केल्या आहेत. डब्ल्यूएचओने सूचना दिल्या की...

ठळक मुद्देडब्ल्यूएचओने सूचना दिल्या आहेत, की कोरोनाचा जेथे प्रसार होत आहे, तेथील आरोग्य केंद्रांवरील प्रत्येक व्यक्तीने फेस मास्कचा वापर करावा12 वर्ष अथवा त्याहून अधिक वय असलेल्या मुलांसह सर्वांनीच फेस मास्कचा वापर करावा.मुले, विद्यार्थी आणि पाहुन्यांसाठीही शिफासर

वॉशिंग्टन - जगभरात कोरोनाचे थैमान अद्यापही सुरूच आहे. यामुळे सर्वच देशांत फेस मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. याच अनुशंगाने जागतिक आरोग्य संघटनेने बुधवारी फेस मास्क वापरासंदर्भातील नव्या गाईडलाईन्स आणखी कठोर केल्या आहेत. डब्ल्यूएचओने सूचना दिल्या आहेत, की कोरोनाचा जेथे प्रसार होत आहे, तेथील आरोग्य केंद्रांवरील प्रत्येक व्यक्तीने फेस मास्कचा वापर करावा. यापूर्वी जून महिन्यात डब्ल्यूएचओने सर्व सरकारांना सूचना देत सार्वजनिक ठिकाणी आत आणि बाहेर प्रत्येकाने फेब्रिक मास्कचा वापर करावा, असे म्हटले होते. 

आता WHOच्या नव्या गाईडलाईन्स - आता कोरोना व्हायरसची दुसरी लाट वेग धरू लागली आहे. या अनुशंगाने डब्ल्यूएचओने बुधवारी जारी केलेल्या सविस्तर शिफारशींमध्ये सूचना दिल्या आहेत, की ज्या भागात कोरोना पसरत आहे. तेथे 12 वर्ष अथवा त्याहून अधिक वय असलेल्या मुलांसह सर्वांनीच फेस मास्कचा वापर करावा. दुकाने, कार्यालये आणि शैक्षणिक संस्थानांमध्ये हवेच्या क्लियरन्सचे व्यवस्थापन खराब असल्यास, हे अत्यंत आवश्यक आहे.

मुले, विद्यार्थी आणि पाहुन्यांसाठीही शिफासर -गाईडलाईन्सनुसार, जेथे व्यवस्थितपणे हवेचे व्यवस्थापन नसेल, अशा घरांमध्येही पाहुने आल्यानंतर फेस मास्कचा वापर करण्यात यावा. जेथे हवेचे चांगले व्यवस्थापन आहे, मात्र, आपसांत एक मिटरचे अंतर ठेवणे शक्य नाही, अशा ठिकाणीही फेसमास्कचा अवश्य वापर करण्यात यावा.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे, की फेस मास्क व्हायरसपासून संरक्षण देतात. याच बरोबर सातत्याने हात धुण्यावरही भर द्यायला हवा. गाईडलाईन्समध्ये अशीही सूचना देण्यात आली आहे, की कोविड-19 रुग्णांची देखभाल करताना हेल्थ केअर वर्कर्सनी एन-95 मास्कचा वापर करावा. याच बरोबर जागतिक आरोग्य संघटनेने एक सल्लाही दिला आहे, की कठोर शारिरीक कार्य करणाऱ्या लोकांनी मस्काचा वापर करू नये. यासंदर्भातील धोके सांगताना त्यांनी विशेषतः दम्याच्या रुग्णाना होणाऱ्या समस्यांचा संदर्भ दिला.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस