Coronavirus: US retains entire stock of Remadesevir | Coronavirus: ‘रेमडेसेविर’ औषधाचा संपूर्ण साठा अमेरिकेने स्वत:साठी राखून ठेवला

Coronavirus: ‘रेमडेसेविर’ औषधाचा संपूर्ण साठा अमेरिकेने स्वत:साठी राखून ठेवला

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूंमुळे होणाऱ्या आजारावर उपचार म्हणून वापरल्या जाणाºया रेमडेसेविर’ या अ‍ॅन्टीव्हायरल औषधाचा सप्टेंबरपर्यंत उत्पादित होणारा सर्व साठा फक्त आपल्या उपयोगासाठी राखून ठेवण्याचा करार अमेरिका सरकारने औषधाच्या उत्पादक कंपनीशी केला आहे. परिणामी, कंपनी पुढील तीन महिने कोणत्याही देशाला हे औषध पुरवू शकणार नाही.

‘गिलिएड सायन्सेस’ कंपनी ‘रेमडेसेविर’चे उत्पादन करते. कंपनीकडून औषधाचे सुमारे पाच लाख ‘ट्रीटमेंट कोर्सेस’ अमेरिका सरकार देशातील इस्पितळांना पुरविणार आहे. या औषधाचा एक ‘ट्रीटमेंट कोर्स’ ६.२४ व्हाएल्सचा असतो. प्रत्येक इस्पितळास किती औषध पुरवायचे, याचा कोटा ठरविला आहे. इस्पितळांकडून औषधाच्या प्रत्येक ‘ट्रीटमेंट कोर्स’साठी ३,२०० डॉलर या घाऊक दराने किंमत आकारली जाईल.

‘गिलिएड सायन्सेस’ कंपनीच्या उत्पादन कार्यक्रमानुसार जुलैमध्ये ९४,२००, आॅगस्टमध्ये एक लाख ७४ हजार ९०० व सप्टेंबरमध्ये दोन लाख ३२ हजार ८०० ‘ट्रीटमेंट कोर्स’ एवढ्या औषधाचे उत्पादन केले जाईल. त्यापैकी ९० टक्के उत्पादन अमेरिका घेईल. अमेरिका, युरोप व आशियातील ६० ठिकाणच्या १.०६३ कोरोना रुग्णांवर या औषधाच्या चाचण्या घेतल्या असता इतर औषधांच्या तुलनेत लवकर व चांगला गुण येतो, असे कंपनीचे म्हणणे आहे.

भारतीय कंपन्यांनी केले करार

  • भारतातील सिप्ला लि, डॉ. रेड्डीज लॅबॉरेटरीज, इव्हा फार्मा व झायडस कॅडिल्ला हेल्थकेअर यांनी औषधाच्या उत्पादनासाठी ‘गिलिएड सायन्सेस’शी करार केले असल्याचे कळते. या कंपन्या औषधाची किंमत ठरवू शकतील. मात्र, सरकारी यंत्रणांकडून परवानग्या घेण्याची जबाबदारी त्यांची असेल.
  • ‘कोविड-१९’ला महामारी म्हणून जाहीर करणारा जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय लागू असेपर्यंत वा या आजारावर अन्य औषध किंवा लस उपलब्ध होईपर्यंत परवाना घेतलेल्या अमेरिकेबाहेरील कंपन्यांना ‘गिलिएड सायन्सेस’ला रॉयल्टी द्यावी लागणार नाही.
  • अमेरिकेतील सर्व उत्पादन अमेरिका घेणार असल्याने कंपनी अन्य देशांतते पुरवू शकणार नाही.
  • अन्य देशांना औषध मिळावे यासाठी कंपनीने भारत, इजिप्त व पाकिस्तानंमधील काही कंपन्यांना औषध बनविण्याचे तंत्रज्ञान व परवाना देण्याचे ठरविले आहे. अमेरिकेबाहेर हे औषध ‘जेनेरिक’ स्वरूपात विकले जाईल.

 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: US retains entire stock of Remadesevir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.