Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2020 12:30 IST2020-04-24T08:09:12+5:302020-04-24T12:30:02+5:30
Coronavirus : अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यां आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे.

Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू
कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 190,654 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 27 लाखांहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 745,620 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने थैमान घातले आहे या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची आणि मृतांची संख्या ही सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा आठ लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 3,176 लोकांचा मृत्यू झाला. जॉन हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या 24 तासांत तब्बल 3,176 लोकांचा मृत्यू झाला असून हा मोठा आकडा आहे. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या ही जवळपास 50 हजार झाली आहे.
United States records 3,176 #Coronavirus deaths in 24 hours; total fatalities near 50,000: AFP news agency quoting Johns Hopkins tally
— ANI (@ANI) April 24, 2020
अमेरिकेतील कोरोनाबाधितांची आकडेवारी जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या 880,204 झाली असून आतापर्यंत 49,845 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनासाठी संशयितांची चाचणी करण्याचे भारताचे धोरण (स्ट्रॅटेजी) योग्य ठरल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 23 मार्चला 14,594 जणांचे नमुने तपासले असता रुग्णसंख्या 400 वर पोहोचली, तर 22 एप्रिलपर्यंत 5 लाख नमुने तपासल्यानंतर 22 हजार रुग्ण आढळले. इतर देशांच्या तुलनेत भारतात 5 लाख चाचण्यांमागे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे प्रमाण 4.5 टक्के आहे. अमेरिकेत 26 मार्चला 5 लाख चाचण्यांनंतर 80 हजार रुग्ण सापडले होते. यावरून जगाच्या तुलनेत भारताचे धोरण आतापर्यंत प्रभावी ठरल्याचा दावा पर्यावरण सचिव व एमपॉवर्ड ग्रुप-२ चे अध्यक्ष सी. के. मिश्रा यांनी केला आहे.
लॉकडाउनच्या तीस दिवसांमध्ये आपण रुग्णांपर्यंत पोहोचलो. कोरोना प्रसाराची साखळी रोखू शकलो. जगभरापेक्षा भारतात कोरोना प्रसाराचा वेग बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचेही ते म्हणाले. गेल्या तीस दिवसांचा आढावा त्यांनी पत्रकारांसमोर मांडला. मिश्रा म्हणाले, तीस दिवसांच्या लॉकडाउनमध्ये भारताने चाचणी क्षमता 33 पटींनी वाढवली आहे. अमरनाथ यात्रा यंदा रद्द करण्याचा निर्णय सरकारने गुरुवारी मागे घेतला. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे ही यात्रा जून महिन्यात होईल. कोरोना संसर्गाच्या कारणास्तव अमरनाथ यात्रा यावर्षी रद्द करण्याचे सरकारने बुधवारी ठरविले होते. या यात्रेला देशातून दरवर्षी लाखो भाविक जातात.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus: अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली; प्रसाराचा वेग स्थिर
CoronaVirus: मेच्या मध्यात देशातील मृतांचा आकडा ३८ हजारांवर जाणार?