शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

coronavirus: कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी लागतील तब्बल एवढी वर्षे, बिल गेट्स यांनी केला मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2021 11:15 PM

Bill Gates big claims about coronavirus : गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात कोरोनामुळे जगभरात २७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जगातील अनेक देशांनी कोरोनावरील लस विकसित केली आहे.

वॉशिंग्टन - डिसेंबर २०१९ मध्ये चीनमधील वुहान येथून कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाली होती. (coronavirus ) तेव्हापासून आतापर्यंत कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. गेल्या वर्ष सव्वा वर्षाच्या काळात कोरोनामुळे जगभरात २७ लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत जगातील अनेक देशांनी कोरोनावरील लस विकसित केली आहे. मात्र आतापर्यंत कुणालाही ही महामारी कधीपर्यंत संपुष्टात येईल, हे कुीच सांगू शकलेला नाही. आता कोरोनाची साथ कधीपर्यंत संपुष्टात येईल, याबाबत मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स यांनी मोठा दावा केला आहे. ( The situation created by the corona will return to normal by end of 2022, Bill Gates claims)

पोलंडमधील प्रसारमाध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये बिल गेट्स म्हणाले की, कोविड-१९ च्या ज्या लसी विकसित झाल्या आहेत. त्यामुळे २०२२ च्या अखेरीस जगातील परिस्थिती पूर्वपदावर यायला पाहिजे. कोरोनाची साथ ही एक अविश्वसनीय आपत्ती आहे. मात्र या चिंतेच्या काळात एकच दिलासादायक बाब आहे ती म्हणजे कोरोना विषाणूवरील लस कोरोनाबाबत बिल गेट्स यांचे हे वक्तव्य खूप महत्त्वपूर्ण मानले जात आहे. कारण बिल गेट्स हे याबाबत सुरुवातीपासून तज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. तसेच लस विकसित करण्यासाठी त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध करून देण्यात येत आहे.  

सद्यस्थितीचा विचार केल्यास जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या ही १२ कोटी ५५ लाख ८९ हजार ४६४ एवढी झाली आहे. त्यापैकी २७ लाख ५९ हजार २४६ लोकांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहेत. अमेरिका हा कोरोनाचा सर्वाधिक प्रकोप झालेला देश असून, तिथे सुमारे ३ कोटी लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर ब्राझीलमध्ये आतापर्यंत १ कोटी २२ लाख कोरोना रुग्ण सापडले आहेत. १ कोटी १७ लाख रुग्णांसह भारत या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. मात्र भारतामध्ये कोरोनावरील दोन लसींना परवानगी मिळाली असून, देशात कोरोनावरील लसीकरणाला वेगाने सुरुवात झाली आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBill Gatesबिल गेटसInternationalआंतरराष्ट्रीयHealthआरोग्य