शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

Coronavirus: आता जवळ बसलात तरी ६ महिने तुरुंगवास अन् लाखोंचा दंड होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2020 12:46 PM

 कोरोना व्हायरसनं जगाला विळख्यात घेतलं आहे. अद्यापही त्यावर कोणतंही औषध किंवा लस सापडलेली नाही. कोरोना प्रभाव कमी करण्यासाठी अनेक देश वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत.

सिंगापूरः कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगात हातपाय पसरले आहेत. अनेक देशांना या व्हायसरची भीती सतावते आहे. बऱ्याच देशांनी कोरोनापासून बचावासाठी लॉकडाऊन केलं आहे. विशेष म्हणजे सिंगापूरनं कोरोनाशी दोन हात करण्यासाठी नियमच बदलले आहेत. सिंगापूरनं कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर एक नवीन नियम अंमलात आणला आहे. त्या नियमानुसार आपण एकमेकांच्या जवळ बसल्यास ६ महिने कैद आणि ५ लाख २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे.  कोरोना व्हायरसनं जगाला विळख्यात घेतलं आहे. अद्यापही त्यावर कोणतंही औषध किंवा लस सापडलेली नाही. कोरोना प्रभाव कमी करण्यासाठी अनेक देश वेगवेगळे हातखंडे वापरत आहेत. अशाच प्रकारे सिंगापूर आरोग्य मंत्रालयानं नवीन नियम जारी केला आहे. २७ मार्चला आरोग्य मंत्रालयानं एक सर्क्युलर जारी केलं आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी लोकांनी सुरक्षित अंतर ठेवून बसण्याची सूचना करण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या ऐवजी हा उपाय योजल्यास फायदेशीर ठरू शकतो. तसेच त्याचा अर्थव्यवस्थेवरही कोणताही प्रभाव पडणार नाही. त्यामुळे आता शाळा-कॉलेज, हॉटेल आणि कार्यालयात दोन लोकांमध्ये १ मीटरचं अंतर असणं आवश्यक आहे. जर एखादी व्यक्ती स्वतःची जागा सोडून दुसऱ्या व्यक्तीला भेटायला जात असेल आणि त्या दोघांमध्ये १ मीटरचं अंतर नसल्यास संबंधित व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तसेच त्या व्यक्तीला ६ महिने तुरुंगवास आणि ५ लाख २४ हजार रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. हा नियम ३० एप्रिलपर्यंत लागू राहणार आहे. सिंगापूर सरकारनं नाइट क्लबही बॅन केले आहेत. तसेच एका वेळी १० जण एकत्र येणार नाही, असे नियमही बनवले आहेत. सिंगापूरमध्ये कोरोनाचं पहिलं प्रकरण २३ जानेवारीला समोर आलं. आतापर्यंत इथे ७३२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. इतर देशांच्या तुलनेत हा आकडा नगण्य आहे. त्यामुळे सिंगापूरच्या सरकारनं आतापासूनच सतर्कतेची पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. सिंगापूरमध्ये कोरोना दुसऱ्या टप्प्यात आहे. फक्त गुरुवारी ५२ कोरोनाबाधित नवे रुग्ण सापडले आहेत. यातील २८ जण विदेश प्रवास करून आले आहेत. इतर देशांत जवळ उभं राहणं आणि जाणूनबुजून खोकल्यास किंवा शिंकल्यास गुन्हे नोंदवले जात आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsingaporeसिंगापूर