उपाशी उंदरांचं टोळीयुद्ध: अमेरिकेत भूकेल्या उंदरांचा रस्त्यावर सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2020 12:54 PM2020-04-15T12:54:23+5:302020-04-15T13:16:55+5:30

बाल्टीमोर, वॉश्ंिगटन या शहरात गेल्या 30 दिवसांत 500 कॉल्स हेल्पलाइनवर आलेत की, आमच्या भागात फार उंदीर झालेत, मदत करा.

coronavirus : rodent problem in USA | उपाशी उंदरांचं टोळीयुद्ध: अमेरिकेत भूकेल्या उंदरांचा रस्त्यावर सुळसुळाट

उपाशी उंदरांचं टोळीयुद्ध: अमेरिकेत भूकेल्या उंदरांचा रस्त्यावर सुळसुळाट

googlenewsNext
ठळक मुद्देउंदीर रस्त्यावर फिरू लागलेत आणि त्यापासून आता अजून काही वेगळा आजार होऊ नये असं भय अमेरिकेतल्या मोठय़ा शहरांत दाटलं आहे.

काय आपल्याकडचे लोक, सरकार एवढं सांगतंय घरात बसा, तरी घरात बसायला तयार नाहीत, असं त्रग्यानं आपण म्हणतोही अनेकदा. आणि एरव्हीही आपण विदेशातल्या शिस्तीचं भारी कौतूक करायचो. तिकडे कशी स्वच्छता, तिकडे कसे लोक सिगAल पाळतात, तिकडे कसे सिट बेल्ट लावतात, तिकडे कसं रस्त्यात कुणी थुंकत नाही. असे पाढे  विदेश वारी विशेषत: अमेरिका दौरा करुन आलेल्यांकडून नेहमी ऐकवले जातात.
ते खोटं किंवा गैरलागू असतं असंही नाही. मात्र कोरोनाच्या काळात आपल्या अवाढव्य पसारा असलेल्या देशानं जे करुन दाखवलं ते लॉक डाऊन खरोखर अभूतपूर्व आहे. पंतप्रधानांनीही त्याचं भाषणात कौतूक केलं. त्याचं कारण असं की, लोकसंख्येची प्रचंड घनता असूनही लोकांनी लॉक डाऊन ब:यापैकी उत्तम पाळलं.
आणि तिकडे अमेरिकेत ते ही न्यूयॉर्कमध्ये सरकार लोकांसाठी ‘अॅडव्हायजरी’ काढून थकलं की, फिरायला जाऊ नका, परस्परांपासून लांब रहा, मास्क लावा मात्र तरीही लोक जुमानत नाहीत असं चित्र आहे. 21 हजार लोक अमेरिकेत कोरोनाला बळी पडलेत तरी लोक अजून त्यांचं गांभिर्य समजायला तयार नाही. म्हणून तर आजही न्यूयॉर्कच्या सेण्ट्रल पार्क मध्ये फिरायला येणा:यांची, मॉर्निग वॉक करणा:यांची गर्दी दिसते. त्यातले काही मास्कही लावत नाहीत. 6 फुट अंतर ठेवा असं वारंवार सांगूनही लोक ते ऐकत नाहीत., गाइडलाइन्स पाळत नाहीत. न्यू यॉर्कचे महापौर बिल डे ब्लासियो म्हणतात, महिना झाला आम्ही सतत सूचना देतो आहोत, लोकांना सांगत आहोत, पण लोक ऐकत नाहीत. यासंदर्भात आता कठोर होण्यापलिकडे आमच्याहाती फार पर्याय उरलेले नाहीत.
एकीकडे माणसं अशी ऐकत नाहीत, दुसरीकडे आता उंदीरही धीट झालेत ते कुणाला जुमानत नाहीत असं चित्र आहे.
अमेरिकेतही अनेक शहरांत हॉटेल्स, रेस्टॉरण्ट, किराणा दुकानं बंद झाली.
त्यात उंदरांचेही खाण्याचे हाल होऊ लागलेत.
आता उंदीर रस्त्यावर आलेत. सैरावैरा पळत आहेत. त्यांना खायला काही नाही म्हणून ते या भागातून त्या भागात जात आहेत.
तिथं उंदरांमध्येही टोळी युद्ध अटळ आहे. त्या लढाईत जो जिंकेल, तो भाग त्याचा, जो शक्तीशाली तो वाचणार हे तर उघडच आहे. रोडण्ट अर्थात या कृदंत प्राण्यांचे तज्ज्ञ रोडण्टोलॉजिस्ट बॉबी कॉरीगॅन सांगतात. उंदीर तरी काय हा माणसासारखाच सस्तन प्राणी आहे. एरव्ही तो वेगळा वागत असला तरी भूक लागली की, तो वेगळा वागतो. भूक जेंव्हा त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न होते, तेव्हा तो त्या भूकेसाठी हल्ला करणं, मारणं हे करतोच.
त्यामुळे आपल्या भागात खायला मिळत नसेल तर उंदीर दुस:या भागात जाणार हे उघड आहे.’
त्यामुळेच सध्या अमेरिकेत उंदरांचा सुळसुळाट झाला आहे. तो ही अनेक मोठय़ा शहरांत.  बाल्टीमोर, वॉश्ंिगटन या शहरात गेल्या 30 दिवसांत 500 कॉल्स हेल्पलाइनवर आलेत की, आमच्या भागात फार उंदीर झालेत, मदत करा.
माणसं घरात अडकली, खाण्यापिण्याच्या जागा ओस पडल्या, तसे उंदीर रस्त्यावर फिरू लागलेत आणि त्यापासून आता अजून काही वेगळा आजार होऊ नये असं भय अमेरिकेतल्या मोठय़ा शहरांत दाटलं आहे.
 

Web Title: coronavirus : rodent problem in USA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.