Coronavirus: आमचा भूकबळी जाण्यापासून वाचवा, इम्रान खान यांनी जगापुढे पसरले हात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2020 09:30 AM2020-04-13T09:30:29+5:302020-04-13T09:50:49+5:30

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या सार्क देशांसाठीच्या फंडातून पाकिस्तानने कोरोनाविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती.

coronavirus paksitan pm imran khan asked help from world to grant debt relief to pakistan vrd | Coronavirus: आमचा भूकबळी जाण्यापासून वाचवा, इम्रान खान यांनी जगापुढे पसरले हात

Coronavirus: आमचा भूकबळी जाण्यापासून वाचवा, इम्रान खान यांनी जगापुढे पसरले हात

Next
ठळक मुद्देकोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून, पाकिस्तानातही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे.कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानची कोरोना व्हायरसच्या संकटाशी दोन हात करताना अक्षरशः नाकीनऊ येत आहे. लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे.

इस्लामाबादः कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलेलं असून, पाकिस्तानातही परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. कर्जबाजारी झालेल्या पाकिस्तानची कोरोना व्हायरसच्या संकटाशी दोन हात करताना अक्षरशः नाकीनऊ येत आहे. लॉकडाऊनमुळे देशभरात सर्व व्यवसाय बंद पडल्यामुळे आता पाकिस्तानात उपासमारीची समस्या निर्माण झाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देश आणि जगाला संबोधून रविवारी एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी जगाच्या देशांना पाकिस्तानला उपासमारीपासून वाचवण्याचे आवाहन केले आहे. इम्रान खान यांचे हे आवाहनही म्हणजे कोरोनाच्या निमित्तानं कर्ज माफ करण्याची मोहीम मानली जात आहे.

ट्विटर आणि अन्य सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या व्हिडीओ संदेशात इम्रान खान यांनी जगाच्या वित्तीय संस्थांना आवाहन केले आहे की, या संकटाच्या काळात पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशांसाठी काही तरी ठोस मोहीम राबवावी. या मोहिमेअंतर्गत विकसनशील देशांचे कर्ज माफ करण्यात यावं, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानसारख्या कर्जबाजारी देशाची अर्थव्यवस्था कोरोनासारख्या महारोगराईचा सामना करण्यासाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. जगातील बड्या संस्थांनी अशा विकसनशील देशांना मदत करण्यासाठी आणि त्यांना कर्जमाफी देण्यासाठी मोहीम सुरू करण्याची गरज असून, त्यासाठी पुढे यायला हवे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेल्या सार्क देशांसाठीच्या फंडातून पाकिस्तानने कोरोनाविरुद्ध लढण्याच्या नावाखाली पैशांची मागणी केली होती. आता इम्रान खान यांनी जागतिक समुदायाला आवाहन केले आहे की, जर पाकिस्तानला लवकरच मदत केली नाही तर कोरोनाच्या आधी लोक उपासमारीने मरतील. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांना विकसनशील देशांना मदत करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून ते कोरोना व्हायरसच्या आव्हानांवर मात करू शकतील.

'उपासमारीपासून लोकांना वाचवा'
इम्रानने व्हिडीओ मेसेजमध्ये म्हटले आहे की, लोकांना कोरोनाच्या संसर्गापासून वाचवायचे आहे, परंतु  लॉकडाऊनमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असून, या परिस्थितीतून त्यांना स्वत: चे संरक्षणही करावे लागणार आहे. जागतिक समुदायाने लोकांना उपासमारीपासून वाचविणे आवश्यक आहे. विकसनशील देशांना भेडसावणारी समस्या वेगळी असून, विकसनशील आणि विकसित देशांकडे असलेल्या स्त्रोतांमध्ये खूप असमानता आहे. विकसनशील देशांकडे आता आरोग्य सेवांवर अतिरिक्त पैसे खर्च करण्यासाठी पुरेसा निधी नाही.

Web Title: coronavirus paksitan pm imran khan asked help from world to grant debt relief to pakistan vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.