शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Coronavirus : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडणार; इम्रान खान यांच्याकडून लॉकडाऊनची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2020 08:17 IST

इराणच्या सीमेलगत असलेल्या सिंध प्रातांत कोरोनाच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे.

इस्लामाबादः दहशतवादाला कायमच खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानचं कोरोना व्हायरसनं अक्षरशः कंबरडं मोडलं आहे. सध्या पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांची संख्या 878वर पोहोचली आहे. त्यामुळे पाकिस्तान पुरता कोलडमला आहे. अनेक देशांनी लॉकडाऊन केले असतानाही पाकिस्ताननं लॉकडाऊन केल्यास जनता गरिबीनं उपाशी राहिली, अशी मल्लिनाथी केली होती. कोरोनाच्या संकटाशी मुकाबला करण्यासाठी पाकिस्ताननं चीनकडेही मदतीची याचना केली होती. इराणच्या सीमेलगत असलेल्या सिंध प्रातांत कोरोनाच्या संसर्गाच्या रुग्णांची संख्या वाढल्यामुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनीसुद्धा देशात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. चहूबाजूंनी वाढता दबाव लक्षात घेता इम्रान खान यांनी पंजाब, खैबर-पख्तूनख, बलुचिस्तान, गिलगिट-बल्टिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तत्पूर्वी कोरोनानं सर्वाधिक प्रभावित झालेल्या सिंधमध्ये पूर्णतः लॉकडाऊन करण्यात आलं होतं. जास्त करून भागात लॉकडाऊनची परिस्थिती आहे. सेनेचे जवान सक्तीचं त्याची अंमलबजावणी कशी होईल, यावर लक्ष केंद्रित करून आहेत, अशी माहिती पाकिस्तान सेनेचे मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी दिली आहे. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी पाकिस्तानी गृहमंत्रालयानं सेनेची मदत मागितली होती. पाकिस्तानी सैन्यानं या कठीण प्रसंगात स्थानिक प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे. खरं तर कालपर्यंत इम्रान खान लॉकडाऊन करण्यास तयार नव्हते. जर लॉकडाऊन केल्यास मजूर आणि गरीब जनता घरातच उपाशी मरेल, अशी भीती इम्रान खान यांना सतावते आहे. परंतु आंतरराज्य जनसंपर्क महासंचालकां(आयएसपीआर)नी ही जागतिक रोगराई असून, या विषाणूचा प्रादुर्भाव रोखायचा असल्यास जनतेला घराबाहेर पडू न देणं हा एकमेव उपाय असल्याचं स्पष्ट केलं होतं. पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांनीसुद्धा या संकटाशी मुकाबला करण्यासाठी अतिरिक्त सैन्याच्या तुकड्या तैनात केल्या आहेत. तसेच त्यांना वैद्यकीय मदतही पुरवण्याचे आदेश दिले आहेत. पाकिस्तानमधली विमान सेवाही खंडित करण्यात आली आहे. सध्या लॉकडाऊन केलेल्या शहरांत शाळा, कॉलेज, दुकानं, ऑफिस, बाजार, मॉल्स, सिनेमागृह हे सर्व बंद करण्यात आलं आहे. अत्यावश्यक सुविधाच सुरू राहणार आहेत. पाकिस्तानमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्याही झपाट्यानं वाढत असून, पाकिस्तानमध्ये कोरोना झालेल्या लोकांची संख्या ९५०वर पोहोचली आहे. त्यात ४०७ रुग्ण हे एकट्या सिंध प्रांतातील आहेत.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानcorona virusकोरोना वायरस बातम्याImran Khanइम्रान खान