शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
3
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
4
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
5
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
6
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
7
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
8
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
9
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
10
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
11
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
12
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
13
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
14
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
15
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
16
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
17
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
18
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
19
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
20
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 

CoronaVirus : पाकिस्तानचा दावा! लवकरच अशी लस तयार करणार, की एकाच डोसमध्ये कोरोना नष्ट होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 9:08 PM

पाकिस्तानने या वर्षी तीन फेब्रुवारीलाच लसीकरण अभियानाला सुरुवात केली होती. चीनने 5 लाख डोस दिल्यानंतर पाकिस्ताने या अभियानाला सुरुवात केली होती. (CoronaVirus Pakistan)

इस्लामाबाद - कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी चीन आणि इतर देशांकडून मिळणाऱ्या लशींच्या मदतीने पाकिस्तानात लसीकरण अभियान सुरू आहे. मात्र आता, पाकिस्तानने एक मोठा दावा केला आहे. आम्ही लवकरच अशी लस तयार करू, जिचा केवळ एकच डोस घ्यावा लागेल, असे पाकिस्तानने म्हटले आहे. खरे तर, अशी लस तयार करण्यासाठी पाकिस्तानला चीनची एक टीम मदतही करत आहे. (CoronaVirus Pakistan to make single dose corona vaccine chinese team to help scientists)

CoronaVirus: आता घरो-घरी जाऊन लसीकरण करण्याची तयारी, 45 वर्षांखालील लोकांनाही मिळू शकते कोरोना लस!

पाकिस्तानच्या 'एक्सप्रेस ट्रिब्यून'च्या वृत्तानुसार, एका अधिकाऱ्याने नॅशनल असेंबलीच्या पॅनलला यासंदर्भात माहिती दिली आहे, की नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH) लवकरच पाकिस्ताची आपली कोरोना लस तयार करेल. जिचा केवळ एकच डोस घ्यावा लागेल. ही लस चीनची CansinoBio कोविड लसच असेल आणि पाकिस्तान याचे तंत्र चीनकडून घेईल. विशेष म्हणजे यासाठी पाकिस्तानने क्लिनिकल ट्रायलदेखील केले आहे.

NIHचे कार्यकारी संचालक मेजर जनरल आमिर इकराम यांनी म्हटले आहे, की पाकिस्तानने चीनला लशीची टेक्नॉलॉजी ट्रान्सफर करण्याची विनंती केली आहे. लशीसाठी लागणारा कच्चा माल याच महिन्यात पाकिस्तानला पोहोचेल. याशिवाय, चीनचा एक चमूही पाकिस्तानला पोहोचला आहे. 

भारतात रशियन व्हॅक्सीन Sputnik V ला मंजुरी; जाणून घ्या, Covishield, Covaxinच्या तुलनेत किती आहे प्रभावी?

'गावी'च्या सहाय्याने पाकिस्तानला मिळणार भारताने तयार केलेली लस - पाकिस्तानने या वर्षी तीन फेब्रुवारीलाच लसीकरण अभियानाला सुरुवात केली होती. चीनने 5 लाख डोस दिल्यानंतर पाकिस्ताने या अभियानाला सुरुवात केली होती. पाकिस्तानला ग्लोबल अलायन्स फॉर व्हॅक्सीन अँड इम्यूनायझेशन अर्थात 'गावी'च्या सहाय्याने भारताने तयार केलेली लसही मिळणार आहे. जूनपर्यंत लशीचे 1.6 कोटी डोस पाकिस्तानात पोहोचण्याची आशा आहे.

"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"

वर्ल्डोमीटरवर असलेल्या डेटानुसार, पाकिस्तानात आतापर्यंत 7 लाख 34 हजार 423 रुग्ण समोर आले आहेत. तर एकूण 15 हजार 754 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे. येथे टेस्टिंग कमी होत असल्यानेही कोरोनाबाधितांची आकडेवारी कमी दिसत असल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान