शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

CoronaVirus News : महिन्याला ६ लाख रुपये कमावणारा पायलट बनला डिलिव्हरी बॉय; लॉकडाऊनने आयुष्यच बदलली!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 1:17 PM

CoronaVirus News : सगळंच बंद असल्यानं लोकांचं बाहेर खाणं, शॉपिंग करणं आणि प्रवास करणं जवळपास बंद झालेलं आहे.

कोरोनानं जगभरात थैमान घातलं असून, अनेक देशांनीही कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे. लॉकडाऊन केल्यानं बऱ्याच  देशांतील उद्योगधंदे ठप्प आहेत. सगळंच बंद असल्यानं लोकांचं बाहेर खाणं, शॉपिंग करणं आणि प्रवास करणं जवळपास बंद झालेलं आहे. त्याचा अनेक उद्योगधंद्यांवर परिणामही झाला आहे. बेरोजगारांची संख्या लक्षणीयरीत्या वाढतच चालली आहे. हवाई वाहतूक क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात मंदी आलेली आहे. अनेक व्यावसायिक विमानांचे वैमानिक बेरोजगार झालेले आहेत. पण म्हणतात ना, शो मस्ट गो ऑन, त्यामुळेच अनेक जण कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करण्यासाठी या लॉकडाऊनच्या काळात पडेल ते काम करण्यासाठी तयार आहेत.थायलंडमध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. एकेकाळी निळ्या आकाशात विमान उडवणारा वैमानिक आता डिलिव्हरी बॉय बनला असून, घरोघरी सामान पोहोचवताना दिसतो आहे. ४२ वर्षीय या को-पायलटचं नाव नकरीन इंटा आहे. गेल्या ४ वर्षांपासून तो कमर्शिअल पायलटच्या स्वरूपात काम करतो आहे. पण कोरोनाच्या संकटानं त्याला पायलटवरून डिलिव्हरी बॉय बनवण्यासाठी हतबल केलं आहे. सीएनएन ट्रॅव्हल्सकडे तो म्हणाला, एअरलाइन्सनं आपल्या जास्त करून कर्मचाऱ्यांना पगाराविना सुट्टीवर पाठवलं आहे. तसेच ज्या कर्मचाऱ्यांना पगार मिळतो आहे, तो मिळून न मिळाल्यासारखाच आहे. अनेकांना नोकरीवरूनही काढून टाकण्यात आलं आहे. या कठीण काळात माझे अनेक सहकारी दुसरा व्यवसाय करत आहेत. सर्वांनाच कामावर परत कधी बोलवता आहेत, याची प्रतीक्षा आहे. यात नोकरीवरून काढून टाकलेल्यांचाही समावेश आहे.पण महत्त्वाच्या उड्डाणांसाठी त्यांना पैसे दिले जात आहेत. एक पायलट म्हणून महिन्याला मी ४ ते ६ लाख रुपये कमावत होतो. पण या कोरोनाच्या संकटात दोन हजार रुपये कमावणंही मोठी गोष्ट आहे. मला माझे सहकारी केबिन क्रू, कॅप्टन आणि इतरांची खूप आठवण येत आहे. जेव्हा कधी या आठवणी उचंबळून येतात, तेव्हा आकाशातून जाणाऱ्या विमानाकडे मी पाहतो. एक डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारा नकरीन सांगतो, जेव्हा मला पहिल्यांदा डिलिव्हरी मिळाली तेव्हा मी ती ग्राहकांपर्यंत व्यवस्थित पोहोचली, तो अनुभव माझ्यासाठी वेगळाच होता. तेव्हा मला जाणवलं मी हेसुद्धा काम करू शकतो. पण तरीही नकरीनला आकाशात विमान उडवण्याची प्रतीक्षा आहे. कारण पायलट बननं हे त्याचं स्वप्न होतं.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या