CoronaVirus News: सूर्यप्रकाशामुळे होतो कोरोना विषाणूचा नायनाट, अमेरिकी संसर्गजन्य रोगतज्ज्ञांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2020 07:09 IST2020-08-18T03:11:16+5:302020-08-18T07:09:55+5:30
कोरोनाचा विषाणू सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतो हे याआधी काही शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे.

CoronaVirus News: सूर्यप्रकाशामुळे होतो कोरोना विषाणूचा नायनाट, अमेरिकी संसर्गजन्य रोगतज्ज्ञांचे मत
वॉशिंग्टन : सूर्यप्रकाशामुळे कोरोनाच्या विषाणूचा नायनाट होतो, असे वक्तव्य अमेरिकेतील आघाडीचे संसर्गजन्य रोगतज्ज्ञ व कोरोना साथीच्या प्रतिबंधासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नेमलेल्या गटाचे सदस्य डॉ. अॅन्थनी फौसी यांनी केले आहे. मॅथ्यू मॅकग्नी या अभिनेत्याने इन्स्टाग्रामवर घेतलेल्या मुलाखतीत डॉ. फौसी म्हणाले की, सूर्यप्रकाशाचे अनेक फायदे आहेत. घरात बसून राहण्यापेक्षा आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा ते एक प्रकारे चांगले असते. अनेक गोष्टींचा अप्रत्यक्षपणे आपल्याला लाभ मिळत असतो. घरातील वातावरणापेक्षा बाहेरचे वातावरण नेहमी चांगले, असे मला वाटते. शरीराला आवश्यक असलेले ‘ड’ जीवनसत्व हेदेखील सूर्यप्रकाशामुळे मिळत असते. कोरोनाचा विषाणू सूर्यप्रकाशामुळे नष्ट होतो हे याआधी काही शास्त्रज्ञांनीही मान्य केले आहे.
>यूव्ही-सी लाईटचा प्रत्ययकारी वापर
विविध संसर्गजन्य रोगांचे विषाणू नष्ट करण्यासाठी यूव्ही-सी लाईटचा वापर शास्त्रज्ञ करतात. कोरोनाच्या विषाणूचा नायनाट करण्याकरिता यूव्ही-सी लाईट उपयोगी ठरेल का, याबाबत सध्या प्रयोग सुरू आहेत. लिफ्ट, शाळा, रेस्टॉरंट, सार्वजनिक वाहतुकीची साधने निर्जंतुकीकरण करण्यासाठी सध्या यूव्हीसी-लाईटचा वापर केला जातो.