शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

CoronaVirus News: कोरोनावर लस बनवण्यात चीन आणतोय अडथळे; 5 देशांच्या गुप्तचर यंत्रणांचा खळबळजनक गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2020 1:16 PM

आता बरेच देश कोरोनावर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु चीन त्यात अडथळे आणत असल्याचाही पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा संसर्ग मनुष्यापासून मनुष्यामध्ये पसरला आहे हे चीन सातत्यानं नाकारत आहे. विशेष म्हणजे बऱ्याच काळापासून चीनला याची जाणीव असल्याचे ठाम पुरावेही समोर आले आहेत. चीननं ही गोष्ट मान्य करण्यासाठी आठवडा घालवला, तोपर्यंत युरोप आणि अमेरिकेत कोरोनानं हातपाय पसरलेले होते. चीनमधील ज्या डॉक्टर किंवा पत्रकारांनी कोरोना विषाणूची माहिती देण्याचा आणि त्याच्या धोक्यांविषयी सांगण्याचा प्रयत्न केला ते अचानकच गायब झाले आहेत. 

बीजिंग: जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासून चीनकडे अनेक देश संशयाच्या नजरेनं पाहत आहेत. कोरोना व्हायरस हा चीनमधील वुहानच्या प्रयोगशाळेतच तयार झाल्याचा दावा अमेरिकेकडून वारंवार करण्यात येत आहे. तसेच चीननं संसर्ग जगभरात पसरेपर्यंत त्याची कुठेही वाच्यता न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही चीनबद्दल बरीच नाराजी आहे. आता बरेच देश कोरोनावर लस बनवण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु चीन त्यात अडथळे आणत असल्याचाही पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी दावा केला आहे. अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमधील गुप्तचर यंत्रणांच्या संबंधित हेरांनी चीन लस बनवण्यात अडथळे निर्माण करत असल्याचा दावा केला आहे.  द सनच्या एका वृत्तानुसार, या पाच देशांच्या गुप्तचर यंत्रणांनी संयुक्तपणे 15 पानांचे एक डॉसियर तयार केले आहे. जगाला कोरोना विषाणूची लस लवकरात लवकर मिळावी, अशी चीनची इच्छा नाही. चीननं अनेक देश आणि स्वतंत्र वैज्ञानिक संस्थांना कोरोनाचे थेट नमुने देण्यास नकार दिला आहे. तसेच इतर देशातील वैज्ञानिकांना ग्राऊंड झिरोवर जाण्याची किंवा घटनास्थळाला भेट देण्याची परवानगी दिली नाही, असा दावासुद्धा या डॉसियरच्या माध्यमातून करण्यात आला आहे. अहवालात काय आहे दावा?१. कोरोनाचा संसर्ग मनुष्यापासून मनुष्यामध्ये पसरला आहे हे चीन सातत्यानं नाकारत आहे. विशेष म्हणजे बऱ्याच काळापासून चीनला याची जाणीव असल्याचे ठाम पुरावेही समोर आले आहेत. चीननं ही गोष्ट मान्य करण्यासाठी आठवडा घालवला, तोपर्यंत युरोप आणि अमेरिकेत कोरोनानं हातपाय पसरलेले होते. २. चीनमधील ज्या डॉक्टर किंवा पत्रकारांनी कोरोना विषाणूची माहिती देण्याचा आणि त्याच्या धोक्यांविषयी सांगण्याचा प्रयत्न केला ते अचानकच गायब झाले आहेत. ३. वुहानमधील प्रयोगशाळेत वटवाघळांमध्ये सापडलेल्या हानिकारक विषाणूंवर संशोधन चालू असल्याचे पुरावे मिळाले आहेत. या प्रयोगशाळेतील संशोधनादरम्यान कोणत्याही संरक्षणाचा उपकरणांचा वापर केला जात नव्हता. त्याचे फोटोसुद्धा समोर आले होते, ते चीननं आता हटवले आहेत. ४. चीनने वुहानमधली ती प्रयोगशाळाच नष्ट केली नाही, तर त्यात काम करणारे लोकही गायब केले.५. जगभरातील शास्त्रज्ञांना कोरोना विषाणूचे थेट नमुने पाठविण्यास चीन सतत नकार देत आहे, ज्यामुळे लस विकसित करण्याची गती आणखी मंदावली आहे.६. चीनने संक्रमणाच्या सुरुवातीच्या काळात कठोरपणे आपल्या देशात प्रवासी बंदी लागू केली, परंतु इतर देशांना सांगितले की, ही केवळ खबरदारी आहे, प्रत्येकाने तसे करण्याची गरज नाही.या अहवालात असे म्हटले आहे की, बीजिंगला डिसेंबरमध्येच विषाणूची पूर्ण माहिती होती, परंतु 31 डिसेंबरला अधिकृतपणे माहिती प्रसिद्ध केली. कोरोना मनुष्यातून मनुष्यामध्ये संक्रमित होतो हे चीनला सांगण्यास चीनला 20 दिवस लागले, तोपर्यंत केवळ वुहानमध्ये 25 हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झालेली होती. 23 जानेवारीपासून काही लाख लोकांनी वुहानमधून जगातील कित्येक देशांमध्ये प्रवास केला आहे, त्यानंतर संबंधित देशात कोरोना संसर्गाची प्रकरणं वाढू लागली, असं चीनच्या अधिकृत कागदपत्रांवरून समोर आलं आहे.  या व्यतिरिक्त कोरोनाविषयी माहिती देणारे व्हिसलब्लोअर आणि डॉक्टर बेपत्ता होण्याबाबत चीन सरकारने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

CoronaVirus News: केंद्राची सूचना असली तरी...; मद्यविक्रीवरून आशिष शेलारांचा राज्य सरकारला सल्ला

CoronaVirus : आम्हाला कुत्र्यासारखं पळवून लावलं; आता परतणार नाही; सूरत सोडताना मजुरांचा संताप

चिनी ड्रॅगनला घायाळ करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांची खेळी; अमेरिकेकडून मोठी घोषणा

CoronaVirus News: सरकारनं सध्या लोकांच्या हाती पैसा देऊ नये, त्याऐवजी...; अभिजीत बॅनर्जींची सूचना

Coronavirus: ...तर ‘तियानमेन चौका’सारखी परिस्थिती उद्भवेल अन् चीन-अमेरिकेमध्ये होईल 'युद्ध'; अंतर्गत अहवालातून खुलासा

Coronavirus: कौतुकास्पद! कर्तव्य बजावतानाच पोलिसानं रस्त्यावर उघडली शाळा अन् मुलांना देतोय शिक्षणाचे धडे

Coronavirus: दारू महागली! 'या' राज्यात मद्यावर ७० टक्के अतिरिक्त कर लागणार

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीनAmericaअमेरिका