शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

CoronaVirus News : कोरोनाचा मुक्काम दीर्घकाळ राहणार, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2021 12:46 AM

CoronaVirus News: जगभरात आतापर्यंत ७८ कोटी लसी दिल्या गेल्या असून अजूनही ही महासाथ आटोक्यात आलेली नाही.

संयुक्त राष्ट्रे : चीनमधून उगम पावलेली आणि संपूर्ण जगात पसरलेली कोरोना विषाणूची महासाथ नजीकच्या भविष्यात तरी संपुष्टात येण्याची चिन्हे नाहीत. कोरोना विषाणू दीर्घकाळ भूतलावर वास्तव्य करणार असून लसीकरणाबरोबरच आरोग्याची योग्य ती काळजी घेणे हेच तूर्तास आपल्या हाती आहे, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) अध्यक्ष टेड्रोस घेब्रेस्युस यांनी केले आहे. येथे आयोजित एका पत्रकार परिषदेत घेब्रेस्युस यांनी कोरोना महासाथीविषयी सविस्तर विवेचन केले. कोरोनाचे वास्तव्य दीर्घकाळपर्यंत राहणार असून त्यापासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. जगभरात आतापर्यंत ७८ कोटी लसी दिल्या गेल्या असून अजूनही ही महासाथ आटोक्यात आलेली नाही. नववर्षाच्या प्रारंभी जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांत सलग सहा आठवडे कोरोना फैलावाचा आलेख घसरणीला लागला होता. मात्र, आता सलग सात आठवडे कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. अनेक आशियाई तसेच मध्य पूर्वेकडील देशांमध्ये कोरोना झपाट्याने पसरत आहे. जगभरात लसीकरण मोहिमेने वेग घेतला असला तरी केवळ लस हाच या महासाथीवरील एकमेव उपाय आहे, असे नाही, असेही घेब्रेस्युस म्हणाले. 

कोरोनातून बरे झालेल्यांवर या विषाणूचे दीर्घकालीन परिणाम संभवतात. काही लोकांमध्ये या आजाराविषयी बेफिकिरी दिसून येते. विशेष करून तरुणांमध्ये. आपल्याला हा आजार होणारच नाही, हा त्यांचा भ्रम आहे. त्यामुळे हा भ्रम दूर करण्याबरोबरच काळजी घेणे हेच इष्ट. - टेड्रोस घेब्रेस्युस, जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना