CoronaVirus News: उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल की वाढेल? संशोधकांनी दिली धक्कादायक माहिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 21:07 IST2020-06-10T20:39:30+5:302020-06-10T21:07:28+5:30
कॅनडातील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी, यासंदर्भात होत असलेल्या व्यापक वैज्ञानिक चर्चे विषयी माहिती दिली आहे. यात वातावरण बदलाचा विशेषतः गरमीच्या दिवसांचा कोरोना पसरण्याच्या वेगावर काय परिणाम होतो, यावर भाष्य करण्यात आले आहे.

CoronaVirus News: उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग कमी होईल की वाढेल? संशोधकांनी दिली धक्कादायक माहिती
टोरंटो : एकिकडे उन्हामुळे कोरोनाचा संसर्ग पसरण्याचा वेग कमी होईल, असे बोलले जात आहे. मात्र, असे असतानाच एका अभ्यासात धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की अधिक काळ उन्ह राहिल्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढेल. मात्र, हे उन्हाच्या व्हायरसवरील परिणामांसंदर्भात नाही, तर लोकांच्या सवयींसंदर्भात म्हणण्यात आले आहे.
‘जिओग्राफिकल अॅनालेसिस’मध्ये छापून आलेल्या एका अभ्यासात म्हणण्यात आले आहे, की उन्ह पडू लागल्याने लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडत आहेत. यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढतो.
भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही
कॅनडातील मॅकमास्टर युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वात झालेल्या एका अभ्यासात संशोधकांनी, यासंदर्भात होत असलेल्या व्यापक वैज्ञानिक चर्चे विषयी माहिती दिली आहे. यात वातावरण बदलाचा विशेषतः गरमीच्या दिवसांचा कोरोना पसरण्याच्या वेगावर काय परिणाम होतो, यावर भाष्य करण्यात आले आहे.
संशोधक सांगतात, की इन्फ्लुएंझा आणि SARS सारखे आजार कमी तापमानात आणि आर्द्रतेत तयार होतात. तर COVID-19 पसरवणाऱ्या व्हायरस SARS-CoV-2संदर्भात फारशी माहिती नाही. तसेच अर्थव्यवस्थेला लवकरात लवकर उघडण्याचा मोठा दबाव आहे. पण उन्हाळ्याच्या दिवसांत, असे करणे योग्य ठरले का? हेदेखील अनेकांना जाणून घ्यायचे आहे, असेही संशोधकांनी म्हटले आहे.
दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...
मॅकमास्टर युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक आणि प्रमुख अभ्यासक अंतोनियो पायेजा यांनी सांगितले, की SARS-CoV-2वर वातावरण बदलाचा काय परिणाम होतो, हे 'सर्वसाधारणपणे आपल्या दैनंदीन व्यवहारांवरील निर्बंधांवरच अवलंबून आहे.
यासंशोधनात दिसून आले, की अधिक तापमान आणि आर्द्रतेमध्ये एक टक्क्याने वाढ झाली, तर COVID-19चे रुग्ण तीन टक्क्याने कमी होतात. याचाच दुसरा अर्थ, अधिक तापमानामुळे व्हायरसची क्षमता कमी होणे असाही होतो.
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही
संशोधकांनी म्हटले आहे, अधिक वेळ सूर्य राहिल्यानंतर अधिक रुग्ण वाढलेले दिसत आहेत. संसोधक म्हणतात, की याचा संबंध मानवाच्या व्यवहाराशी असू शकतो. कारण अधिक वेळ दिवस राहिल्याने लोक लॉकडाउनच्या नियमांचे पालन करत नाहीत आणि घराबाहेर पडतात. हेही यामागचे एक कारण असू शकते.
Corona Vaccine Update: या भारतीय कंपनीमध्ये तयार होतेय कोरोनाची 'सर्वात अॅडव्हान्स्ड' व्हॅक्सीन