शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : झक्कास बातमी!; रशियाने तयार केली कोरोना लस; सर्व चाचण्याही यशस्वी झाल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 16:13 IST

मॉस्‍को - कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियाने बाजी मारली आहे.   रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील व्हॅक्सीन तयारकेली असल्याचा दावा केला आहे. ...

ठळक मुद्देरशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील व्हॅक्सीन तयारकेली असल्याचा दावा केला आहे.या व्हॅक्सीनचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडले आहेत. विद्यापीठाचा हा दावा सत्य सिद्ध झाला, तर ही कोरोना व्हायरसवरील जगातली पहिली व्हॅक्सीन ठरेल.

मॉस्‍को - कोरोना व्हॅक्‍सीनवर रशियाने बाजी मारली आहे.  रशियातील सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनावरील व्हॅक्सीन तयारकेली असल्याचा दावा केला आहे. विद्यापीठाने म्हणटले आहे, की या व्हॅक्सीनचे सर्व प्रकारचे परीक्षण यशस्वीपणे पार पडले आहेत. विद्यापीठाचा हा दावा सत्य सिद्ध झाला, तर ही कोरोना व्हायरसवरील जगातली पहिली व्हॅक्सीन ठरेल. अमेरिकेसह जगातील अनेक विकसित देश कोरोनावर व्हॅक्‍सीन तयार करण्यासाठी दिवस-रात्र एक करत आहेत. अनेक जण ट्रायलदरम्यान अयशस्वीही झाले आहेत. मात्र, रशियाने पहली व्हॅक्‍सीन यशस्वी झाल्याचा दावा करत बाजी मारली आहे.

18 जूनलाच सुरू झाले होते व्हॅक्सीनचे ​​परीक्षण - इंस्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल मेडिसिन अँड बायोटेक्नॉलॉजीचे संचालक वदिम तरासोव यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठाने 18 जूनलाच रशियाच्या गेमली इंस्टिट्यूट ऑफ अॅपिडेमियोलॉजी अँड मायक्रोबायोलॉजीने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या ​​परीक्षणाला सुरूवात केली होती. तारासोव म्हणाले, सेचेनोव्ह विद्यापीठाने कोरोनो व्हायरसविरोधातील जगातील पहिल्या व्हॅक्सीनचे स्वयं सेवकांवरील परीक्षण यशस्वीपणे पूर्ण केले आहे.

लवकरच बाजारात येणार व्हॅक्सीन -सेचेनोव्ह यूनिव्हर्सिटीने म्हटले आहे, की इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल पॅरासिटोलॉजी आणि ट्रॉपिकल अँड वेक्टर-बॉर्न डिसिजचे संचालक अलेक्झँडर लुकाशेव यांच्या मते, या संपूर्ण संशोधनाचा हेतू, मानवी आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोविड-19वरील व्हॅक्सीन यशस्वीपणे तयार करणे होता.  लुकाशेव यांनी स्पुतनिकला सांगितले, की सुरक्षिततेच्या दृष्टाने या व्हॅक्सीनच्या सर्व बाबींची तपासणी केली आहे. तसेच लोकांच्या सुरक्षिततेसाठी ही व्हॅक्सीन लवकरच बाजारात उपलब्ध होईल. 

ड्रग्ज सारख्या महत्वपूर्ण उत्पादनांच्या निर्मितीसाठीही विद्यापीठ सक्षम -तारसोव म्हणाले, सेचेनोव्ह विद्यापीठाने केवळ एक शैक्षणिक संस्था म्हणूनच नाही, तर एक वैज्ञानिक आणि टेक्निकल रिसर्च केंद्र म्हणूनही कौतुकास्पद काम केले आहे. महामारीच्या परिस्थितीत ड्रग्ज सारख्या महत्वपूर्ण आणि जटिल उत्पादनांच्या निर्मितीसाठीही हे विद्यापीठ सक्षम आहे. तसेच ते म्हणाले, परीक्षणातील स्वयंसेवकांच्या दुसऱ्या गटाला 20 जुलैला सुट्टी देण्यात येईल.

अमेरिकेच्या मॉडर्नाचीही घोषणा - जगभरात अनेक देशांमध्ये कोरोना व्हायरस व्हॅक्सीनचे परिक्षण सुरू असतानाच अमेरिकन बायोटेक कंपनी मॉडर्नाने आपल्या व्हॅक्सीनचे अखेरचे परीक्षण जुलै महिन्यात करण्याची घोषणा केली होती. ही कंपनी परीक्षणाच्या अखेरच्या टप्प्यात पोहोचली असून 30 हजार जणांवर कोरोना व्हायरस व्हॅक्सीन देण्याची योजना आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus : आता उत्तर प्रदेशात लॉकडाउनचा नवा फॉर्म्युला, असा आहे योगी सरकारचा 'प्लॅन'

CoronaVirus : मोलकरणीच्या नावानं पाठवलं पत्नीचं Corona सॅम्पल, रिपोर्ट आला पॉजिटिव्ह!; मग...

धक्कादायक! : हनीट्रॅप अन् 9 कोटी 'हेर'; धूर्त चीन अशी करतो जगाची 'हेरगिरी'

CoronaVirus News: कोरोना व्हायरसवरील सर्वात प्रभावी, सुरक्षित अन् स्वस्त औषध 'Dexamethasone'; संशोधकांचा दावा

खुशखबर...! औषध सापडलं...! एड्सबाधित रुग्ण झाला ठणठणीत; वैज्ञानिकांचा दावा

ड्रॉप होऊ शकते कोरोना व्हॅक्सीनची तिसरी ट्रायल? ICMRच्या वरिष्ठ वैज्ञानिकानं दिलं असं उत्तर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याrussiaरशियाAmericaअमेरिकाVladimir Putinव्लादिमीर पुतिन