शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : "कोरोनावरील उपचाराबाबत दोन आठवड्यात देणार 'खूशखबर', करणार मोठी घोषणा"

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 15:08 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश आले आहे. याच दरमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं विधान केलं आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. अमेरिका, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे. याच दरमान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठं विधान केलं आहे.

येत्या काही दिवसांत कोरोना उपचारासंदर्भात खूशखबर असल्याचं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. पुढील दोन आठवड्यांमध्ये कोरोनावरील उपचारासंबंधी आपल्या प्रशासनाकडून एका चांगल्या बातमीची घोषणा करण्यात येईल असं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हे महत्त्वाचं विधान केलं आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा 42 लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवस कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. 

अमेरिकेतील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून आतापर्यंत 1 लाख 46 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनापुढे अमेरिकेसारखा मोठा देशही हतबल झाला आहे. महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळत आहे. रॉबर्ट ओ ब्रायन (Robert O'Brien)  यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. व्हाईट हाऊसने दिलेल्या माहितीनुसार, रॉबर्ट ओ ब्रायन यांनी चाचणीचा रिपोर्ट आल्यावर स्वत:ला आयसोलेट केलं आहे. 

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 16,643,498 वर गेली असून 656,621 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 10,231,837 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाने थैमान घातलेले असतानाच अनेक दिलासादायक घटना समोर येत आहे. जगभरात कोरोनासंदर्भात संशोधन सुरू असून शास्त्रज्ञांना यश मिळत आहे. याच दरम्यान कोरोनाच्या या लढ्याला आणखी एक मोठं यश मिळालं आहे. शास्त्रज्ञांना कोरोनाला रोखणारी तब्बल 21 औषधं सापडल्याची माहिती मिळत आहे. ही औषधं कोरोना व्हायरसचा प्रसार रोखू शकतात. सॅनफोर्ड बर्नहम प्रीबायस मेडिकल डिस्कवरी इन्स्टिट्यूट ऑफ अमेरिकेच्या शास्त्रज्ञांनी हे संशोधन केलं आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

कौतुकास्पद! भारताच्या लेकींची कमाल, शोधला मंगळाच्या कक्षेत फिरणारा नवा 'लघुग्रह' 

CoronaVirus News : परिस्थिती गंभीर! 'या' देशात कोरोनाचा उद्रेक, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांना लागण

सप्तपदीनंतर नवरा-नवरी पोहोचले थेट पोलीस ठाण्यात; कारण ऐकून तुम्हीही कराल भरभरून कौतुक

CoronaVirus News : आनंदाची बातमी! देशाचा रिकव्हरी रेट 64.23%, जगभरात एक कोटी लोकांनी केली कोरोनावर मात

CoronaVirus News : मोठं यश! कोरोनाला रोखणारी 21 औषधं सापडली; शास्त्रज्ञांचा दावा

CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक

CoronaVirus News : लढ्याला यश! फक्त 400 रुपयांत होणार कोरोना टेस्ट, एका तासात येणार रिपोर्ट

CoronaVirus News : कडक सॅल्यूट! जंगलातून रस्ता पार करत 'ही' नर्स लोकांपर्यंत पोहचवते मोफत औषधं

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDeathमृत्यूDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प