CoronaVirus News : चिंताजनक! 6 आठवड्यात कोरोनाग्रस्तांमध्ये दुप्पट वाढ; WHOने बोलावली इमर्जन्सी बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 08:35 AM2020-07-28T08:35:57+5:302020-07-28T10:39:42+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. धडकी वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 6 आठवड्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.

जगभरात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटींवर पोहचली असून तब्बल सहा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.

जगभरातील कोरोना रुग्णांची संख्या 16,643,498 वर गेली असून 656,621 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 10,231,837 लोकांनी कोरोनावर मात केली आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईनच्या माध्यमातून काळजी घेतली जात आहे. खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे.

जगभरात कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणाबाबत जागतिक आरोग्य संघटनेने पुन्हा एकदा इशारा दिला आहे. अजून सर्वात वाईट स्थिती येणं बाकी असल्याचं म्हटलं आहे.

जगभरात योग्य पावले उचलली नाही तर हा व्हाररस आणखी लोकांना संक्रमित करू शकतो. काही दिवसांपूर्वीच WHO कडून जगभरातील नेत्यांना कोरोनावरून राजकारण न करण्याचा इशारा दिला होता.

जगभरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. धडकी वाढवणारी आकडेवारी समोर येत आहे. गेल्या 6 आठवड्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे.

कोरोनाचा धोका वाढला असून चिंताजनक परिस्थिती निर्माण झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेने इमर्जन्सी बैठक बोलावली आहे. WHOचे प्रमुख टेड्रोस अदनोम घेब्रेयसस यांनी ही बैठक बोलावली आहे.

WHOच्या बैठकीत जगातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्याला आता 6 महिने होत असून त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होत आहे.

कोरोनाने जगभरातील देशांना आणि लोकांना जवळही आणलं आणि दूरही केलं. या आजाराने सगळं जगचं आता बदलून गेलं आहे असंही टेड्रोस यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस एडहनॉम यांनी कोरोनाच्या व्हायरसबाबत जेवढी अधिक माहिती मिळेल तेवढ्याच प्रभावीपणे त्याचा सामना करता येऊ शकतो असं म्हटलं आहे.

जगभरात युद्धपातळीवर कोरोना व्हाययरसवर औषध आणि लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी चाचण्यांना यश देखील आले आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोन व्हयरसने लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. तर दुसरीकडे अनेकांनी कोरोनाची लढाई जिंकली असून उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

राष्ट्रीय एकतेत कमतरता, वैश्विक एकजुटतेत कमतरता आणि विभागलं गेलेलं जग कोरोना व्हायरसचा वेग वाढवत आहे. जर याला थांबवलं गेलं नाही तर आणखी वाईट स्थिती येणं बाकी आहे असं टेड्रोस यांनी म्हटलं होतं.

कोरोना व्हायरस लवकरात लवकर नष्ट व्हावा. सर्वांनाच आपल्या सामान्य जगण्याकडे परत यायचंय. पण कटूसत्य हेच आहे की, आपण अजूनही ही महामारी संपण्यापासून खूप दूर आहोत असं देखील म्हटलं आहे.

व्हायरसची निर्मिती नेमकी कशी झाली, याचा शोध घेणेही महत्त्वाचे आहे. आगामी काही दिवसांत जागतिक आरोग्य संघटनेचे पथक चौकशीसाठी चीनमध्ये जाणार असल्याचं याआधी सांगितलं आहे.

चीन आधीपासूनच कोरोना चीनमधून पसरला नसल्याचा दावा करत आहे. जगभरातून चीनवर टीका होत आहे. अशात दबावामुळे चीनने चौकशी टीमला परवानगी दिली असली तरी या चौकशीत चीन सरकारची पूर्ण मदत मिळते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.