शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : सलाम! ...म्हणून ड्युटी संपल्यावर खास कोरोनाग्रस्तांसाठी नर्स वाजवते वायोलिन

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2020 16:55 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates: जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे.कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. आतापर्यंत जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही एक कोटीच्या वर गेली आहे.कोरोना रुग्णांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. अशीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.

कोरोना योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णांची सेवा करत आहेत. अशाच एका नर्सचा व्हिडीओ आता समोर आला आहे. चिलीची राजधानी सेंटियागो मधील El Pino रुग्णालयातील हा व्हिडीओ असल्याची माहिती मिळत आहे. रुग्णसेवा करून ड्युटी संपल्यानंतरही रुग्णालयात थांबून नर्स खास कोरोना रुग्णांसाठी वायोलिन वाजवते. डॅमारीस सिल्व्हा असं या 26 वर्षीय नर्सचं नाव असून ती ड्युटी संपल्यावर रुग्णांना अशा पद्धतीने आनंद देते. त्यांच्यात उत्साह निर्माण करते.  

रुग्णालयात सेवा केल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता ती हातात वायोलिन घेते आणि ते वाजवत रुग्णालयातील वॉर्डमध्ये फिरते. आठवड्यातून दोन दिवस ती खास रुग्णांसाठी वायोलिन वाजवते. "माझ्या वायोलिनमधून मी या रुग्णांना थोडंसं प्रेम, थोडासा विश्वास आणि थोडी आशा देते. प्रत्येक वेळी मी हे अगदी मनापासून करते. रुग्ण जेव्हा संगीत ऐकतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर तेज येतं, ते आनंदी होतात आणि टाळ्या वाजवून दादही देतात. हे पाहून खूप बरं वाटतं, मनाला एक समाधान मिळतं" असं नर्सने म्हटलं आहे. 

नर्सचा हा वायोलिन वाजवतानाचा व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले असून सर्वत्र तिचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. जगभरातील अनेक देश कोरोनाचा सामना करत आहेत. कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत 558,091 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर एक कोटीहून अधिक लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. जगातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला असून रुग्णांची संख्या 12,420,705 वर पोहोचली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

"मंदिराच्या समोर आल्यावर फोन करा", डिलिव्हरी पॅकेटवरचा पत्ता पाहून चक्रावून जाल

Vikas Dubey Encounter : "मी समाधानी आहे पण... ", शहीद पोलिसाच्या पत्नीने म्हटलं...

लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल

Vikas Dubey Encounter : "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?"

Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल

Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं

CoronaVirus News : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिंदू कुटुंबाला दिला मुस्लिम महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारानंतर आला फोन अन्...

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdoctorडॉक्टरmusicसंगीतCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या