kanpur encounter martyrs police family reaction on vikas dubey dead in encounter | Vikas Dubey Encounter : "मी समाधानी आहे पण... ", शहीद पोलिसाच्या पत्नीने म्हटलं...

Vikas Dubey Encounter : "मी समाधानी आहे पण... ", शहीद पोलिसाच्या पत्नीने म्हटलं...

नवी दिल्ली - आठ पोलिसांची हत्या घडवणारा गँगस्टर विकास दुबे शुक्रवारी एन्काऊंटरमध्ये ठार झाला आहे. एन्काऊंटरनंतर अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसेच शहीद झालेल्या पोलिसाच्या कुटुंबियांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. कानपूरला नेलं जात असताना पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पोलिसांकडील बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी झालेल्या चकमकीत विकास दुबे ठार झाला. यावर पोलिसाच्या पत्नीने समाधानी आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र यासोबतच एक प्रश्नही उपस्थित केला आहे. 

कानपूर शूटआऊटमध्ये शहीद झालेले पोलीस कर्मचारी सुल्तान सिंह यांच्या पत्नी उर्मिला वर्मा यांनी विकास दुबेच्या एन्काऊंटनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. "मी समाधानी आहे. मात्र आता विकास दुबेला पाठींबा देणारे कोण आहेत हे कसं समोर येणार? त्याची चौकशी झाली असती तर ही माहिती मिळाली असती” असं उर्मिला यांनी म्हटलं आहे. शहीद झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांनी या घटनेनंतर उत्तर प्रदेश प्रशासनाने आभार मानले आहेत. तसेच आज खूप खश असल्याचं म्हटलं आहे. 

काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी सुद्धा याबाबत एक ट्विट केले आहे. प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. विकास दुबे एन्काऊंटरनंतर त्यांनी एक सवाल उपस्थित केला आहे. "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्हे आणि त्यांना संरक्षण देणाऱ्याचे काय?" असं प्रियंका यांनी म्हटलं आहे. याआधीही त्यांनी गुरुवारी याबाबत एक ट्विट केलं होतं. कानपूर हत्याकांडमध्ये उत्तर प्रदेश सरकारने प्रचंड अलर्ट राहून काम करणे अपेक्षित होते. पण ते अपयशी ठरले. अलर्ट असूनही आरोपी उज्जैनपर्यंत पोहोचला असं त्यांनी म्हटलं होतं.

समाजवादी पक्षाचे नेते आणि माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दुबे एन्काऊंटरवरून सरकारवर निशाणा साधला आहे. विकास दुबे ठार झाल्यानंतर अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली" असं म्हणत योगी सरकारवर हल्लाबोल केला आहे. "कार पलटी झाल्यावर विकास दुबेने पळून जाण्याचा प्रयत्न केला हे स्पष्टीकरण संभ्रमात टाकणारे आहे. पळून जायचे होते तर त्याने स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन का केले?, कार पलटी झालेली नाही तर सरकार पलटी होण्यापासून वाचवण्यासाठी हा सर्व प्रकार घडवून आणला आहे" असा आरोप अखिलेश यादव यांनी केला आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

लय भारी! कोरोनामुळे नोकरी गेली पण नशिबाने केलं 'या' भारतीय जोडप्याला मालामाल

Vikas Dubey Encounter : "गुन्हेगाराचा शेवट झाला पण गुन्ह्यांना संरक्षण देणाऱ्यांचे काय?"

Vikas Dubey Encounter : "सरकार पलटी होऊ नये म्हणून कार पलटली", अखिलेश यांचा हल्लाबोल

Vikas Dubey Encounter : लेडी सिंघमने आवळल्या विकास दुबेच्या मुसक्या, जाणून घ्या नेमकं काय घडलं

CoronaVirus News : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! हिंदू कुटुंबाला दिला मुस्लिम महिलेचा मृतदेह, अंत्यसंस्कारानंतर आला फोन अन्...

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: kanpur encounter martyrs police family reaction on vikas dubey dead in encounter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.