शहरं
Join us  
Trending Stories
1
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
2
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
3
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
4
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
5
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
6
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
7
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
8
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
9
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
10
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
11
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
12
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
13
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
14
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
15
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
16
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
17
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
18
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
19
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: अनेक देशांकडून निर्बंध मागे; अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 04:01 IST

परदेशांतून येणा-या प्रत्येकाची सर्व देशांत विमानतळांवर तपासणी केली जात आहे आणि किरकोळ लक्षणे आढळणाऱ्यांनाही ७ ते १४ दिवस क्वारंटाइनमध्ये पाठविले जात आहे.

बँकॉक : जगातील जवळपास सर्व देशांत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली आणि आर्थिक अडचणींतून बाहेर पडण्यासाठी या देशांतील अनलॉक प्रक्रिया सुरू केली असली, तरी सर्वत्र मास्कचा वापर, कोरोनाच्या चाचण्या सुरू असून, प्रवासावरील निर्बंधही अनेक ठिकाणी कायम आहेत.सर्वच देशांनी आपल्या नागरिकांना मास्कचा वापर बंधनकारक केला आहे. पण, अनेक जण त्याचे पालन करीत नसल्याने काही देशांनी मास्क न वापरणाऱ्यांकडून दंड आकारत आहेत वा त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करीत आहेत. परदेशांतून येणा-या प्रत्येकाची सर्व देशांत विमानतळांवर तपासणी केली जात आहे आणि किरकोळ लक्षणे आढळणाऱ्यांनाही ७ ते १४ दिवस क्वारंटाइनमध्ये पाठविले जात आहे.कोरोनाच्या संकटामुळे सर्वच देशांच्या अर्थव्यवस्था अडचणीत आल्या आहेत, तर काही ढासळण्याच्या मार्गावर आहेत. ती रुळावर कशी आणायची, हा तेथील सरकारांपुढील यक्षप्रश्न आहे. त्यामुळे युरोपीय राष्ट्रांनी १ जुलैपासून आपल्या सीमा एकमेकांसाठी खुल्या करण्याचे आणि निर्बंध शिथिल करण्याची घोषणा केली आहे. दुबईने रात्रीची संचारबंदी मागे घेतली असून, तिथे कोणत्याही वेळी कोणालाही फिरण्याची, व्यापाराची, खरेदीची मुभा दिली आहे. मात्र मास्क बंधनकारक आहे.>जिथे मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक जातात, त्या मालदीव, थायलंड, स्पेन आदी देशांनी निर्बंध खूपच कमी केले आहेत. मालदीव व थायलंडची अर्थव्यवस्था आणि तेथील लोकांचे आयुष्य पर्यटन व्यवसायावरच अवलंबून आहे. मात्र तिथेही हॉटल, रिसॉर्ट, बार यांवर अनेक निर्बंध असून, मास्क घालणे बंधनकारक आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या