CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करतोय पाकिस्तान; ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, परिस्थिती हाताबाहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2021 04:35 PM2021-09-13T16:35:21+5:302021-09-13T16:39:00+5:30

CoronaVirus Marathi News and Live Updates: कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत असून रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे.

CoronaVirus Live Updates pakistans oxygen demand exceeding production capacity amid covid 4th wave | CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करतोय पाकिस्तान; ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, परिस्थिती हाताबाहेर

CoronaVirus Live Updates : कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करतोय पाकिस्तान; ऑक्सिजनचा मोठा तुटवडा, परिस्थिती हाताबाहेर

Next

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. रुग्णांच्या संख्येने तब्बल 22 कोटींचा टप्पा पार केला आहे. तर लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे काही ठिकाणी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच दरम्यान पाकिस्तान कोरोनाच्या चौथ्या लाटेचा सामना करत असून तेथील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचा प्रकोप पाहायला मिळत असून रुग्णालयात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा पाहायला मिळत आहे. रविवारी स्थानिक प्रसारमाध्यमांनी पाकिस्तानमधील रुग्णालयात ऑक्सिजनची मोठी गरज भासत असल्याचं म्हटलं आहे. 

देशाची ऑक्सिजन तयार करणारी कंपनी पाकिस्तान ऑक्सिजन लिमिटेड (पीओएल) ने रुग्णालयांना या संदर्भात एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये ऑक्सिजनची वाढती मागणी पूर्ण करण्यास आपण असमर्थ असल्याचं म्हटलं आहे. पीओएल कराची आणि लाहौरमध्ये ऑक्सिजनची निर्मिती करत आहे. मात्र तरी देखील ऑक्सिजनची मोठी कमतरता भासत आहे. परिस्थिती देखील हाताबाहेर गेल्याचं म्हटलं आहे. रुग्णालयात निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णसंख्या वाढत आहे. 

इस्लामाबादमध्ये 71 टक्क्यांहून अधिक लोकांनी घेतला लसीचा पहिला डोस 

एका मंत्र्यांनी ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, इस्लामाबादमध्ये 71 टक्क्यांहून अधिक लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. पाकिस्तानमध्ये शैक्षणिक संस्था या पुन्हा एकदा सुरू करण्याची योजना सध्या तरी नसल्याचं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. लोकांमध्ये कोरोना लसीबाबत अद्यापही थोडे भीतीचे वातावरण आहे. लसीच्या साईड इफेक्टच्या काही घटना समोर येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. अशातच कोरोनाबाबतच्या रिसर्चमधून मोठा खुलासा करण्यात आला आहे. लस न घेतलेल्यांच्या मृत्यूचं प्रमाण दहापट अधिक असल्याचं म्हटलं आहे.

चिंताजनक! 'कोरोना लस न घेतलेल्यांना मृत्यूचा धोका दहापट जास्त'; रिसर्चमधून मोठा खुलासा

रिसर्चमधून कोरोनाची लस घेतलेल्या नागरिकांच्या तुलनेत लस न घेणाऱ्या नागरिकांच्या मृत्यूचं प्रमाण हे दहापट अधिक असल्याचं सिद्ध झालं आहे. युएस सेंटर फॉर डिसिज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन या संस्थेनं अमेरिकेतील विविध भागांत हा प्रयोग केला आहे. कोरोना लसीच्या रिसर्चसाठी 13 विविध राज्यं आणि शहरांतील 6 लाखांपेक्षा अधिक कोरोना रुग्णांचे रिपोर्ट्स, त्यांच्या आजारांचं गांभीर्य, रुग्णालयामध्ये दाखल होण्याचं प्रमाण आणि मृत्यूचे आकडे या बाबींचं सर्वेक्षण केलं. 4 एप्रिल ते 17 जुलै या कालावधीत 18 वर्षांवरील नागरिकांचे नमुने यासाठी तपासण्यात आले.  लस न घेतलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण हे लस घेतलेल्यांच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून आलं. कोरोनाबाबत केल्या गेलेल्या आणखी एका विश्लेषणात मॉडर्नाची लस ही फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सनच्या तुलनेत अधिक प्रभावी असल्याचं दिसून आलं आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates pakistans oxygen demand exceeding production capacity amid covid 4th wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app