CoronaVirus Live Updates : भयावह! 'या' देशात Delta Variant चा हाहाकार; मृतदेहांचे ढिग, दफन करण्यासाठी पाहावी लागतेय वाट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2021 06:27 PM2021-07-03T18:27:24+5:302021-07-03T18:35:35+5:30

Corona Virus Delta Variant : कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने (Delta Variant) थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे.

CoronaVirus Live Updates corona in indonesia delta variant spreading in indonesia | CoronaVirus Live Updates : भयावह! 'या' देशात Delta Variant चा हाहाकार; मृतदेहांचे ढिग, दफन करण्यासाठी पाहावी लागतेय वाट

CoronaVirus Live Updates : भयावह! 'या' देशात Delta Variant चा हाहाकार; मृतदेहांचे ढिग, दफन करण्यासाठी पाहावी लागतेय वाट

googlenewsNext

कोरोनाचं संकट आता आणखी गडद होताना दिसत आहे. जगभरात हाहाकार माजवणाऱ्या कोरोनामुळे सर्वत्र गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक प्रगत देश कोरोनापुढे हतबल झाले आहेत. जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येने तब्बल 18 कोटींचा टप्पा आता पार केला आहे. लाखो लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर काही देशांमध्ये अत्यंत भयावह स्थिती निर्माण झाली आहे. अशातच कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने (Delta Variant) थैमान घातले आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. इंडोनेशियामध्ये डेल्टा व्हेरिएंटचा हाहाकार पाहायला मिळत आहे. 

कोरोना मृतांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याने मृतदेहांचे ढिग लागले आहे. तसेच ते दफन करण्यासाठी नातेवाईकांना खूप वेळ वाट पाहावी लागत आहे. इंडोनेशियात गेल्या दोन आठवड्य़ात नव्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. जूनमध्ये रुग्णालयात प्लास्टिकचे तंबू उभारून आयसीयू तयार करण्यात आले. तसेच रुग्णांना रुग्णालयात बेड उपलब्ध नसल्याने उपचारासाठी कित्येक दिवस वाट पाहावी लागत आहे. फुटपाथवर ऑक्सिजन टँक ठेवण्यात आले आहेत. रुग्णालयापासून दूर असलेल्या मोकळ्या जमिनीत मोठ्या संख्येने कोरोना मृतदेह दफन केले जात आहेत. 

कुटुंबीयांना आपल्या नातेवाईकांना दफन करण्यासाठी खूप वेळ वाट पाहावी लागत आहे. तर कब्रस्तानात काम करणाऱ्या लोकांना रात्री उशीरापर्यंत शिफ्ट करावी लागत आहे. कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत भयावह झाली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. याच दरम्यान पुन्हा एकदा धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. भारतात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटने जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं आहे. अनेक देशांमध्ये रुग्णांची संख्या ही सातत्याने वाढू लागली आहे. आतापर्यंत तब्बल 100 देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आढळल्याची माहिती समोर आली आहे.

भीषण, भयंकर, भयावह! जगभरात Delta व्हेरिएंटचा हाहाकार; भारत, अमेरिका, ब्रिटनसह 100 देशांमध्ये प्रसार

जागतिक आरोग्य संघटनेच्या नव्या आकडेवारीनुसार, कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोकादायक असलेला डेल्टा व्हेरिएंट हा सर्वप्रथम फेब्रुवारीमध्ये भारतात आढळून आला आहे. मात्र आता जवळपास 100 देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. मूळ कोरोना व्हायरसपेक्षा हा व्हेरिएंट अडीचपटीने अधिक संसर्गजन्य आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. भारत, अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंटमुळे बाधितांची संख्या वाढू लागली आहे. 'ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंजा डेटा'ने (GISAID) दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चार आठवड्यात भारताच्या 224 जीनोम सिक्वेंसिंगमधील 67 टक्के प्रकरणे ही डेल्टा व्हेरिएंटशी संबंधित आहेत. GISAID ही व्हायरसच्या व्हेरिएंट जीनोमला ट्रॅक करत असतात. 78 देशांच्या GISAID आकड्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे आढळले की, भारत, रशिया, ब्रिटन, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकासह इतर देशांमध्ये डेल्टा व्हेरिएंट आपली पकड अधिक मजबूत करत आहे.

Web Title: CoronaVirus Live Updates corona in indonesia delta variant spreading in indonesia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.