Coronavirus: काय सांगता? 'या' देशात हात धुण्यासाठी वापरली जातेय चक्क दारू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 05:19 PM2020-04-15T17:19:21+5:302020-04-15T17:26:26+5:30

आता आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता सरकारने रुग्णालयांमध्ये सॅनिटायझरऐवजी अल्कोहोल वापरण्याची परवानगी दिली आहे.

coronavirus japan hospitals get permission to use strong alcohols as sanitisers vrd | Coronavirus: काय सांगता? 'या' देशात हात धुण्यासाठी वापरली जातेय चक्क दारू

Coronavirus: काय सांगता? 'या' देशात हात धुण्यासाठी वापरली जातेय चक्क दारू

Next

टोकियो: कोरोना व्हायरसचा जपानमध्येही झपाट्याने प्रसार होत आहे. आतापर्यंत 8,100 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 147 लोकांचा कोरोनानं मृत्यू झाला आहे. जपानमध्ये पीपीई, मास्क, हातमोजे आणि सॅनिटायझर्सची मोठ्या प्रमाणात कमतरता भासू लागली आहे. जपानमधल्या अनेक रुग्णालयांमध्ये सॅनिटायझर्स संपले आहे. आता आपत्कालीन परिस्थिती लक्षात घेता जपान सरकारने रुग्णालयांमध्ये सॅनिटायझरऐवजी अल्कोहोल वापरण्याची परवानगी दिली आहे.

जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, कोरोनावर उपचार करणार्‍या वैद्यकीय कर्मचार्‍यांना सॅनिटायझरऐवजी अल्होकोलही वापरता येऊ शकते. देशात सॅनिटायझर्सची कमतरता असून, अल्कोहोल मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. डॉक्टरांचा असा विश्वास आहे की, 70% पेक्षा जास्त अल्कोहोलयुक्त मद्यानं सॅनिटायझर केले जाऊ शकते. जपानमधल्या काही व्होडक्याच्या ब्रँडमध्ये एवढ्या प्रमाणात अल्कोहोल असते. तर जपानमध्ये मिळणाऱ्या इतर मद्यात 22 ते 45% टक्के इतकं अल्कोहोल असतं.

जपानी माध्यमांच्या म्हणण्यानुसार, सॅनिटायझरच्या टंचाईनंतर काही मद्य कंपन्यांनी अशी दारू तयार करण्यास सुरुवात केली आहे, ज्यात 70 टक्क्यांपेक्षा जास्त अल्कोहोल आहे. काही जपानी कंपन्या अजूनही सॅनिटायझर अमेरिकेत निर्यात करतात, पण फारच कमतरता भासू लागल्यास त्यावर निर्बंधही लादले जाऊ शकतात. जपानमध्ये तयार करण्यात येणाऱ्या सॅनिटायझर्सच्या माध्यमातून 76 ते 81% टक्के विषाणूपासून मुक्तता मिळत असल्याचा दावा केला जात आहे.

जपानी लोकांना बार, क्लब आणि रेस्टॉरंट्सपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पंतप्रधान शिंजो आबे, राष्ट्रीय कोरोना व्हायरस टास्क फोर्सच्या बैठकीत म्हणाले, "ज्या ठिकाणी लोक रात्रीचे जातात त्या ठिकाणी संसर्ग होण्याच्या अनेक घटनांची घडल्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून तो देशभर पसरला आहे." जपानमध्ये 7 एप्रिल रोजी लॉकडाऊन करण्यात आलं असून, ज्यावर कोणतीही दंडात्मक तरतूद नाही. परंतु लोकांना शक्य तितक्या घरीच राहण्यास सांगितले गेले आहे. आबे यांनी पुन्हा कंपन्यांना कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची परवानगी देण्यास सांगितलं आहे. 
 

Web Title: coronavirus japan hospitals get permission to use strong alcohols as sanitisers vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.