शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

China Coronavirus :चीननं भारतीय तरुणाला मायदेशात परतण्यापासून रोखलं; विमानाचं तिकीट केलं रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 19:17 IST

कोरोना व्हायरसनं चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत 722 लोक मृत्युमुखी पडले

बीजिंग- कोरोना व्हायरसनं चीनमध्ये हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे आतापर्यंत 722 लोक मृत्युमुखी पडले असून, 34546 जणांना त्याची लागण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर चीननंही सतर्कता बाळगली आहे. चीनमध्ये एक भारतीय तरुणही अडकून पडला आहे. त्याचे आईवडीलसुद्धा चितिंत आहेत. तो तरुण चीनमधला योग प्रशिक्षक आहे. चिनी पोलीस त्याला परत भारतात पाठवण्यास तयार नाही. तरुणाच्या आईवडिलांनी त्याला भारतात परत आणण्यासाठी उत्तराखंड विधानसभा अध्यक्षांकडे मागणी केली आहे. ऋषिकेशमध्ये वास्तव्याला असणारा तरुण चीनमध्ये शिक्षकाची नोकरी करतो.कोरोना व्हायरसचा प्रकोप पाहता चिनी पोलिसांनी त्याला मायदेशात परत पाठवण्यास नकार दिला आहे. त्याच्या आईवडिलांनी सांगितलं की, मुलगा चीनमधल्या हेनान प्रांतातल्या नयांगमध्ये योग शिकवण्याचे कार्य करतो. गेल्या अनेक काळापासून तो चीनमध्ये राहून काम करत आहे. तो भारतात परत येत होता, त्यासाठी तिकीटसुद्धा बुक केली होती. परंतु विमानतळावर पोहोचताच चिनी पोलिसांनी त्याला जाण्यापासून मज्जाव करत रोखले. मुलगा परत  न आल्यानं आईवडिलांना त्याची चिंता सतावते आहे. मुलाला सुखरूप परत आणण्यासाठी त्याचे आई-वडील उत्तराखंड विधानसभा अध्यक्ष प्रेमचंद अग्रवाल यांच्याजवळ गेले. त्यांना आईवडिलांनी आपबिती सांगितली असून, प्रेमचंद अग्रवाल यांनी मुलाला परत आणण्याचं आश्वासन दिलं आहे.   

एअर इंडिया, इंडिगोसह अनेक आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी चीनला जाणारी आपली विमाने काही दिवसांसाठी रद्द केली आहेत. सध्याच्या काळात चीनला जाणे टाळा अशा सूचना भारतासह अनेक देशांनी आपापल्या नागरिकांना दिल्या आहेत. जपानच्या समुद्रात नांगरून ठेवलेल्या डायमंड प्रिन्सेस नावाच्या क्रूझमध्ये कोरोनाची लागण झालेल्या प्रवाशांची संख्या आता 61 झाली आहे. या क्रूझमधील एक प्रवासी गेल्या आठवड्यात हाँगकाँगला उतरला. त्याची तपासणी केली असता तो कोरोनाग्रस्त असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर या क्रूझमधील प्रवाशांपैकी 273 जणांची आतापर्यंत तपासणी करण्यात आली आहे. क्रूझवर कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये जपान, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना आदी देशांतील नागरिकांचा समावेश आहे.आणखी महत्त्वाच्या बातम्या

कोरोनामुळे तब्बल 24 हजार मृत्यू; चीनी कंपनीचा डेटा लीक

चीनमध्ये कोरोनाच्या संसर्गामुळे बळींची संख्या ४९० वर; ३,२१९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक

कोरोना व्हायरसमुळे Apple चं मोठं नुकसान; जाणून घ्या कसं

कोरोना विषाणूचे रुग्ण चीनसह ३१ देशांमध्ये; हाँगकाँग, फिलिपिन्समध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू

 'हे' मिश्रण प्यायल्याने होते कोरोना वायरसचे निदान; ब्रिटिश नागरिकाने केला अनोखा दावा

टॅग्स :corona virusकोरोना