शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

Coronavirus : लॉकडाऊन न करता 'या' देशाची कमाल, केली कोरोनावर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 16:14 IST

Coronavirus : जगात सहा लाखांहून अधिक लोकांनी कोरोनाला हरवलं आहे. याच दरम्यान एका देशाने लॉकडाऊन न करता कोरोनावर मात केल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

कोरोनामुळे आतापर्यंत 160,784 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 2,332,471 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 600,006 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतातसह अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत असून खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. तर आतापर्यंत जगात सहा लाखांहून अधिक लोकांनी कोरोनाला हरवलं आहे. याच दरम्यान एका देशाने लॉकडाऊन न करता कोरोनावर मात केल्याची दिलासादायक माहिती समोर आली आहे. 

दक्षिण कोरियानंतर आता हाँगकाँगने लॉकडाऊन न करता कोरोनावर नियंत्रण मिळवल्याची माहिती मिळत आहे. हाँगकाँगमध्ये 31 मार्च रोजी 715 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. तर, एप्रिलच्या अर्ध्या महिन्यापर्यंत 1024 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यापैकी 568 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. त्यामुळे हाँगकाँगने कोरोनाच्या संसर्गावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवले असल्याचे समोर आले आहे. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार, हाँगकाँग आयसोलेशन आणि सोशल डिस्टंसिंगच्या माध्यमातून कोरोनाशी सामना करत आहे.

हाँगकाँगने आपल्या सीमांवर निर्बंध लादले होते. त्याशिवाय कोरोनाग्रस्तांच्या क्वारंटाईनची व्यवस्था करण्यासह त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वच लोकांना क्वांरटाईन केले होते. त्याशिवाय सोशल डिस्टंसिंगचाही पर्याय अवलंबला आहे. या उपाययोजना यशस्वी झाल्यामुळे हाँगकाँगच्या अर्थव्यवस्थेला इतर देशांसारखी मोठी झळ पोहचली नसल्याचे तज्ञ सांगतात. कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर चीन, इटली, स्पेन, भारतासह अनेक देशांमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे या देशांच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

जवळपास 75 लाख लोकसंख्या असलेल्या हाँगकाँगमध्ये सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवर भर देण्यात आला होता. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आणि कोरोनाग्रस्तांच्या संख्येवर नियंत्रण दिसून आल्याचं तज्ञांनी म्हटलं आहे. हाँगकाँग विद्यापीठाचे प्राध्यापक बेंजामिन कॉउलिंग यांनी सांगितले की, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेच्या उपाययोजनांचा मोठ्या प्रमाणांवर अवलंब करण्यात आला. कोविड-19 च्या संसर्गाला रोखण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरले असल्याचे त्यांनी सांगितले. हाँगकाँगकडून इतर देशांनाही खूप काही शिकता येण्यासारखं असल्याचे त्यांनी सांगितलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : Apple Maps देणार आता कोरोना व्हायरस चाचणी केंद्राची माहिती

Coronavirus : भयंकर! 'तो' वाद जीवावर बेतला, सॅनिटायझेशन करणाऱ्या तरुणाची हत्या

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरातील सर्वाधिक मृत्यू अमेरिकेत, रुग्णांचा आकडा 7,38,792 वर

Coronavirus : कौतुकास्पद! लॉकडाऊनमध्ये गर्भवती महिलेसाठी टॅक्सी ड्रायव्हर ठरला देवदूत

Coronavirus : धोका वाढला! देशात एका दिवसात 2154 नवे रुग्ण, कोरोनाग्रस्तांची संख्या 16,000 वर

Coronavirus : बापरे! भाजीवाल्याला कोरोनाची लागण, तब्बल 2,000 जण क्वारंटाईन

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यूIndiaभारत