शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: हाहाकार! जगभरात कोरोनाचे बळी ३३००० पार; अमेरिकेत वेगवेगळे प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2020 23:14 IST

जगभरात जवळपास १९० हून अधिक देशांना कोरोनाने विळखा घातला आहे. या देशांमध्ये 7,02,368 रुग्ण सापडले आहेत.

पॅरिस : जगभरात कोरोनाने जगभरात हाहाकार उडविला आहे. अमेरिकेनेही गुडघे टेकले असून तिथे रुग्णांची संख्या लाखावर गेली आहे. तर इटली आणि स्पेनमध्ये मृतांचा एका दिवसाचा आकडा हजाराच्या आसपास घुटमळत आहे. जगभरात आज कोरोनाच्या मृत्यूंच्या एकूण आकड्याने ३३००० संख्या पार केली आहे. 

जगभरात जवळपास १९० हून अधिक देशांना कोरोनाने विळखा घातला आहे. या देशांमध्ये 7,02,368 रुग्ण सापडले आहेत. तर 33,519 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 150,732 रुग्ण बरे झाले आहेत. इटलीमध्ये कोरोना विषाणूमुळे पहिला मृत्यू फेब्रुवारीमध्ये झाला होता. आतापर्यंत येथील सरकारने 10,023 लोकांच्या मृत्यूचा आकडा स्पष्ट केला आहे. इटलीमध्ये 92,472 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली असून त्यापैकी 12,384 लोक बरे झाले आहेत. मृत्यूच्या बाबतीत स्पेननेही इटलीनंतर चीनला मागे टाकले आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 6,528 लोक मरण पावले आहेत आणि 78,747 लोक संक्रमित झाले आहेत. स्पेनमध्ये गेल्या 24 तासात राजकन्येसह 838 लोक मरण पावले. यापूर्वी शनिवारी इटलीमध्ये सर्वाधिक ९७० मृत्यूमुखी पडले होते, जे एकाच दिवसातील सर्वाधिक मृत्यू आहेत. 

अमेरिकेत कोरोनावर उपचार करण्यासाठी वेगवेगळे  प्रयोग केले जात आहेत. ह्यूस्टनच्या एका मोठ्या रुग्णालयात कोविड -१९ पासून बरे झालेल्या रुग्णाचे रक्त या आजाराने ग्रासलेल्या एका रुग्णाला चढविण्यात आले आहे. प्राणघातक कोरोना विषाणूंपासून बरा झाल्यानंतर दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चांगल्या स्थितीत राहिलेल्या व्यक्तीने रक्ताचा प्लाझ्मा दान केला आहे.  हा प्लाझ्मा ह्युस्टन मेथोडिस्ट हॉस्पिटलमधील 'कॉन्व्लेसेन्ट सीरम थेरपी' साठी दिला आहे. उपचाराची ही पद्धत 'स्पॅनिश फ्लू' साथीच्या आजारावेळी वापरण्यात आली होती. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmericaअमेरिकाDeathमृत्यूItalyइटली