शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

Coronavirus: कोरोनामुळे जगभरात ७० लाख मृत्यू, या मासिकाच्या दाव्याने खळबळ, भारतातील आकडेवारीबाबत म्हणाले... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2021 09:53 IST

Coronavirus News: जगातील प्रसिद्ध मासिक असलेल्या द इकॉनॉमिस्टने जगातील अनेक देश कोरोनामुळे होत असेलल्या मृत्यूंची योग्य माहिती देत नसल्याचा दावा केला आहे.

नवी दिल्ली - गेल्या दीड वर्षापासून कोरोना विषाणूने संपूर्ण जगात धुमाकूळ घातले आहे. जगभरात दररोज हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. तर लाखो लोकांना संसर्ग होत आहे. (Coronavirus) दरम्यान, कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या आकड्यावरून संशय व्यक्त केला जात आहे. अनेक देशांनी कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबतचा योग्य आणि खरा आकडा जगासमोर आणलेला नाही, असा आरोप केला जात आहे. जगातील प्रसिद्ध मासिक असलेल्या द इकॉनॉमिस्टने जगातील अनेक देश कोरोनामुळे होत असेलल्या मृत्यूंची योग्य माहिती देत नसल्याचा दावा केला आहे. आतापर्यंत जगभरात ७० लाख ते १.३ कोटी मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. (The economist says, 7 million deaths worldwide due to coronavirus )

द इकॉनॉमिस्टच्या रिपोर्टनुसार केवळ आफ्रिका आणि आशियाच नाही तर अमेरिका, ब्रिटन, फ्रान्ससारख्या देशांनीसुद्धा कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंबाबत योग्य माहिती दिलेली नाही. या मासिकाने हा दावा मशीन-लर्निंग मॉडेलच्या माध्यमातून केला आहे. दुसरीकडे जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास आतापर्यंत कोरोनामुळे ३८ लाख ३० हजार  लोकांचा मृत्यू झाला आहे. तर जगभरामध्ये आतापर्यंत १७ कोटींहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

आशिया खंडातील अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत सहा लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. तर द इकॉनॉमिस्टच्या दाव्यानुसार आतापर्यंत इथे २४ ते ७१ लाख जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियन देशात कोरोनाबळींचा अधिकृत आकडा ६ लाख आहे. मात्र मासिकाच्या दाव्यानुसार इथे १५ ते १८ लाख जणांच्या मृत्यू झाले आहेत. युरोपमध्ये सरकारी आकडेवारीनुसार १० लाख जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र येथेही १५ ते १६ लाख जणांचा मृत्यू झाल्याचा दावा मासिकाने केला आहे. 

द इकॉनॉमिस्टने भारताताबाबत सांगितले की, इथे दररोज ६ ते ३१ हजार जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारी आकडेवारीमध्ये दररोज ४ हजारा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र भारताने ही आकडेवारी फेटाळून लावली आहे. अनेक गरीब देश कोरोनामुले झालेल्या मृत्यूंचा खरा आकडा लपवत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतInternationalआंतरराष्ट्रीय