शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
6
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
7
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
8
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
9
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
10
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
11
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
12
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
13
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
14
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
15
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
16
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
17
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
18
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
19
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
20
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?

China Coronavirus : जगभरात अलर्ट! कोरोना व्हायरसमुळे 41 जणांनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2020 09:02 IST

चीनने 13 शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत.

ठळक मुद्देकोरोना व्हायरसमुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. चीनने 13 शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन येत्या दहा दिवसांत नवीन रुग्णालय उभं करणार.

बीजिंग - चीनमध्येकोरोना नावाच्या व्हायरसने थैमान घातले आहे. या व्हायरसमुळे आतापर्यंत 41 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 800 हून अधिक जणांना या व्हायरसचा संसर्ग झाला आहे. चीनने 13 शहरांमध्ये प्रवासावर निर्बंध आणले आहेत. या निर्णयाचा 4.1 कोटी लोकांना फटका बसला आहे. चीनमध्ये वेगाने व्हायरस पसरल्यानंतर भारत, अमेरिकासहीत अनेक देशांमध्ये व्हायरससाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. चीनच्या हुबेई प्रांताच्या जिंगझोऊमध्ये सर्वात प्रथम हा विषाणू आढळला होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातून जाणाऱ्या सर्व रेल्वे सेवा बंद राहतील, तर सार्वजनिक बस, पर्यटन बस फेऱ्या व अन्य नौका सेवा अस्थायी स्वरूपात बंद ठेवण्यात आल्या आहेत. 

हुबेई प्रांताच्या आजूबाजूच्या चार शहरांत शियानिंग, शियोगान, एन्शी आणि जिजांग शहरांत प्रवासावर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. कोरोना विषाणूंच्या धास्तीने शांघाई डिज्निलँड या आठवड्यात पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहे. कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी चीन येत्या दहा दिवसांत नवीन रुग्णालय उभं करणार आहे. वुहान शहरात हे रुग्णालय उभारण्यात येणार असून युद्धपातळीवर त्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. चीनमधील स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, कोरोना व्हायरसचा सामना करण्यासाठी रुग्णालय उभारण्यास सुरुवात झाली आहे. 25 हजार स्कवेअर मीटरमध्ये हे रुग्णालय उभे राहणार असून त्यामध्ये 1 हजार बेडची व्यवस्था असणार आहे. रुग्णालय उभारण्याचे काही व्हिडीओ आणि फोटो समोर आले आहेत. 

चीनमधील व्हायरसच्या प्रसाराने भारताची काळजीही वाढली आहे. कारण, जवळपास ७०० भारतीय विद्यार्थी वुहान आणि आजूबाजूच्या परिसरात राहतात. बहुतांश विद्यार्थी चीनच्या विद्यापीठात शिकत आहेत. चीनमध्ये पसरलेल्या कोराना विषाणूंमुळे बीजिंगस्थित भारतीय दूतावासाने प्रजासत्ताक दिनानिमित्तचा कार्यक्रम रद्द करण्याची घोषणा केली आहे.या आजारामुळे चीनमध्ये आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतीय दूतावासाने सोशल मीडियावर याबाबतची माहिती दिली आहे. भारतीय दूतावासाने 26 जानेवारीला आयोजित केलेला प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचं दूतावासाने ट्विट केलं आहे. 

सी-फूड ठरू शकतं कारण

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, कोरोना व्हायरस सी-फूडसंबंधी एक आजार आहे. हा आजार चीनमध्ये सी-फूड बाजारातून पसरला आहे. हा व्हायरस उंट, मांजर, वटवाघूळसहीत अनेक प्राण्यांमध्ये पसरल्यानंतर मनुष्यांमध्ये वेगाने पसरतो.

या व्हायरसची लक्षणे निमोनियासारखीच आहेत. कोरोना व्हायरसने संक्रमित रुग्णाला सर्वातआधी श्वास घेण्याची समस्या होते. त्यासोबतच आणखीही काही लक्षणे बघायला मिळतात. जसे की, घशात वेदना किंवा जळजळ होणे, सर्दी, खोकला, ताप आणि किडनीशी संबंधित समस्याही होऊ शकतात.

महत्त्वाच्या बातम्या

'हिंदुत्व पेलणे हा येरागबाळ्यांचा खेळ नाही'; सामनातून 'मनसे'वर टीकास्त्र

शिवसेनेचे आदित्य विरुद्ध मनसेचे अमित; दोन युवा ठाकरेंच्या वाटचालीकडे लक्ष

राज्यातील राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी सुरू, तत्कालीन भाजप सरकारवर आक्षेप

कोरेगाव भीमा दंगलीचा तपास ‘एनआयए’कडे

बिहारप्रमाणे राज्यातही बोगस हॉस्पिटल; ना डॉक्टर ना पेशंट, बोटांचे ठसे बनवून डॉक्टरांची हजेरी

 

टॅग्स :corona virusकोरोनाchinaचीनIndiaभारतDeathमृत्यूdoctorडॉक्टर