राज्यातील राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी सुरू, तत्कालीन भाजप सरकारवर आक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 07:05 AM2020-01-25T07:05:55+5:302020-01-25T07:06:33+5:30

भाजप सत्तेत असताना विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्याचे व त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचणारे तंत्र इस्रायलवरून मागवण्यात आले

Phone tapping of political leaders in the state continues to be investigated | राज्यातील राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी सुरू, तत्कालीन भाजप सरकारवर आक्षेप

राज्यातील राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंगची चौकशी सुरू, तत्कालीन भाजप सरकारवर आक्षेप

Next

मुंबई : भाजप सत्तेत असताना विद्यमान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार, खा. संजय राऊत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक नेत्यांचे फोन टॅप करण्याचे व त्यांचे व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचणारे तंत्र इस्रायलवरून मागवण्यात आले. त्यासाठी एका आयपीएस अधिकाऱ्यास काही वेळा इस्रायलला पाठवण्यात आले, अशी माहिती आल्याने याची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

या प्रकरणात एका आयपीएस अधिकाºयाचा सहभाग होता. त्या अधिकाºयास सरकारमधील एका बड्या नेत्याने इस्रायलला पाठवले होते. तेथे जाऊन त्या अधिकाºयाने फोन टॅपिंगची व व्हॉट्सअ‍ॅप मेसेज वाचण्याची प्रणाली आणली. ती वापरून विधानसभा निवडणुकीच्या काळात काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना नेत्यांच्या हालचाली, बोलण्यावर लक्ष ठेवले गेले, अशी माहिती आहे.

ही बाब समजल्यावर त्या अधिकाºयाची बदली केली गेली. आता तो अधिकारी स्वेच्छानिवृत्तीच्या विचारात असल्याची माहिती गृह विभागाला मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या प्रकरणाची चौकशी होईपर्यंत त्याला स्वेच्छानिवृत्ती देऊ नये, असेही वरिष्ठ पातळीवर ठरल्याचे समजते. गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले की, भाजप सरकारने लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या काळात विरोधी नेत्यांचे फोनवरील संभाषण ऐकून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केल्याच्या गंभीर तक्रारी आल्या आहेत. त्यासाठी शासकीय यंत्रणेचा, अधिकाऱ्यांचा व शासकीय निधीचा गैरवापर केल्याचे आढळले आहे. इस्रायलहून एक सॉफ्टवेअर आणून, त्याद्वारे हे केल्याची तक्रार आहे. राजकीय फायद्यासाठी शासकीय यंत्रणेचा वापर करणे ही अत्यंत खालच्या दर्जाची कृती आहे.

चौकशी कराच : देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र फोन टॅपिंग ही महाराष्टÑाची संस्कृती नसून, आपल्या सरकारने असे कोणतेही आदेश दिले नव्हते, असे सांगितले. ते म्हणाले की, आताचे सरकार चौकशी करण्यास मोकळे आहे. किंबहुना या प्रकाराची चौकशी करून अहवाल जनतेसमोर ठेवण्यात यावा. तर, राज्यातील काही अधिकारी इस्रायलला गेले. पेगॅसस नावाचे स्पायवेअर वापरले गेले. या सर्वांची चौकशी होणार आहे. चौकशीतून सर्व काही बाहेर येईल, असे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
 

Web Title: Phone tapping of political leaders in the state continues to be investigated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.