धक्कादायक! चिनी ड्रॅगनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना; पलायन केलेल्या वैज्ञानिकाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2020 12:49 PM2020-08-03T12:49:58+5:302020-08-03T12:55:49+5:30

CoronaVirus News & Latest Updates : जगभरातील शास्त्रज्ञ चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत असताना आता एक मोठा खुलासा चीनमधून पलायन केलेल्या वैज्ञानिकाने केला आहे.

Coronavirus created in chinse military lab not wuhan wet market says hong kong scientist | धक्कादायक! चिनी ड्रॅगनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना; पलायन केलेल्या वैज्ञानिकाचा दावा

धक्कादायक! चिनी ड्रॅगनने मिलिट्री लॅबमध्ये बनवला कोरोना; पलायन केलेल्या वैज्ञानिकाचा दावा

Next

चीनच्या वुहानमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगभरात हाहाकार पसरवला आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यात कोरोना विषाणूंचे संक्रमण झाल्यामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोना व्हायरस कसा पसरला, याबाबत वैज्ञानिकांचा अभ्यास सुरू आहे.  जगभरातील शास्त्रज्ञ चीनकडे संशयाच्या नजरेने पाहत असताना आता एक मोठा खुलासा चीनमधून पलायन केलेल्या वैज्ञानिकाने केला आहे.

चीनमधील हाँगकाँग शहरातील हाँगकाँग  स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे जेष्ठ वायरोलॉजिस्ट डॉ ली मेंग यान  हा कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत हा धक्कादायक खुलासा केला आहे. डॉ ली मेंग यान  यांनी दावा केला आहे की, कोरोना व्हायरस हा चीनच्या मिलिट्री लॅबमध्ये तयार करण्यात आला होता. जीवघेणा कोरोना व्हायरस चीनच्या वेट मार्केटमधून पसरल्याचा दावा खोटा असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 

चीनच्या कम्युनिस्ट पक्षाच्या प्रयोगशाळेतून कोरोनाचा प्रसार

ताइवानी वृत्तसंस्थेला माहिती देताना लाईव्ह स्ट्रीमदरम्यान डॉ ली मेंग यान यांनी सांगितले की, ''ही माहामारी जेव्हा सुरू झाली तेव्हापासून मी विश्लेषण सुरू केले होते की, चीनी कम्युनिस्ट पक्षाच्या मिलिट्री प्रयोगशाळेतून हा व्हायरस पसरला होता. ही बाब लपवण्यासाठी वुहानच्या वेट मार्केटची कहाणी रचण्यात आली.  वरिष्ठ अधिकारीवर्गाने  ही बाब अजुनही गांभीर्याने घेतलेली नाही.'' 

पुढे त्यांनी सांगितले की, ''चीनी कम्यूनिस्ट पार्टीविरुद्ध बोलल्यानंतर आम्हाला कधीही तडीपार केलं जाऊ शकतं. सध्या हाँगकाँगमध्ये लोकशाहीच्या समर्थकांसोबत हा प्रकार केला जता आहे. त्यामुळे मी माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. '' वायरोलॉजिस्ट डॉ ली मेंग यान एप्रिल महिन्यात अमेरिकेत आल्या. कारण त्यांना चीनी सरकारकडून अटक होण्याची भीती होती.  चीनी सरकारला बरखास्त करण्यासाठी चीनच्या स्थानिक लोकांनी मदत करण्याचं काम सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

कोरोना विषाणूंशी लढण्यासाठी प्रभावी ठरतेय बीसीजी लस; संक्रमणाचा वेग होईल कमी, तज्ज्ञांचा दावा

चिंताजनक! आता कोरोना विषाणू दीर्घकाळ पाठ सोडणार नाही; WHO ची धोक्याची सुचना

Web Title: Coronavirus created in chinse military lab not wuhan wet market says hong kong scientist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.