Coronavirus: या देशात लसीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवले, मृत्यूंचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी घटले 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 01:00 PM2021-07-07T13:00:10+5:302021-07-07T13:04:14+5:30

Coronavirus in Mexico: मेक्सिको कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मात्र रुग्णालयामध्ये दाखल झालेले रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे.

Coronavirus: Corona Vaccine blocks third wave of coronavirus in Mexico, death rate drops by 80% | Coronavirus: या देशात लसीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवले, मृत्यूंचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी घटले 

Coronavirus: या देशात लसीने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपवले, मृत्यूंचे प्रमाण तब्बल ८० टक्क्यांनी घटले 

Next

मेक्सिको - कोरोना विषाणूच्या साथीने गेल्या पावणे दोन वर्षांपासून संपूर्ण जगभरात धुमाकूळ घालत आहे. कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसलेल्या मेक्सिकोमध्ये (Mexico) सध्या तिसऱ्या लाटेचा फैलाव होत आहे. (Coronavirus) मात्र कोरोना विरोधातील लसीकरणामुळे देशात कमी मृत्यू झाल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. (Corona Vaccination) मेक्सिकोचे अंडर सेक्रेटरी ऑफ प्रिव्हेंशन अँड हेल्थ प्रमोशन ह्युगो लोपेझ-गेटेल यांनी सांगितले की, मेक्सिको कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करत आहे. मात्र रुग्णालयामध्ये दाखल झालेले रुग्ण आणि कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाले आहे. राष्ट्रपती अँड्रेस मेनुअल लोपेझ ओब्रेडोर यांच्यासोबत असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, मेक्सिकोमध्ये कोरोनाची नवी लाट आली आहे. तिला तिसरी लाट म्हणण्यात येत आहे. (Corona Vaccine blocks third wave of coronavirus in Mexico, death rate drops by 80%)

मेक्सिकोमध्ये फेब्रुवारी २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण नोंद झाला होता. त्यानंतर देशात कोरोनाच्या फैलावास सुरुवात झाली होती. मेक्सिकोमध्ये कोरोनाची दुसरी लाट यावर्षीच्या सुरुवातील सुट्ट्यांमध्ये दिसून आली होती. मेक्सिकोमध्ये तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्यावर संसर्गाच्या पहिल्या आठवड्यामध्ये साप्ताहिक रुग्णसंख्येमध्ये २२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर मृत्यूंमध्ये तुलनात्मकदृष्ट्या वाढ झालेली नाही. लोपेझ ओब्रेडोर यांनी सांगितले की, लसीकरणामुळे कोविड-१९ मुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये ८० टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. मेक्सिकोमध्ये आतापर्यंत कोरोनाचे २५ लाख ४१ हजार ८७३ रुग्ण सापडले आहेत. तर २ लाख ३३ हजार ६८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर मृत्यू झालेला मेक्सिको हा अमेरिका, ब्राझील आणि भारतानंतरचा चौथा देश आहे.

दरम्यान, भारतामध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी तिसऱ्या लाटेबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत होत नाही आहे. पण एसबीआयच्या म्हणण्यानुसार ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यानंतर देशात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ शकते. त्यानंतर सुमारे महिनाभरानंतर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा पिक येऊ शकतो. अवहालात म्हटले आहे की, गेल्या सात मे रोजी दुसऱ्या लाटेचा पिक आला होता. आणि जुलैच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कोरोनाच्या संसर्गाच्या नव्या रुग्णांची पातळी १० हजारांपर्यंत कमी होऊ शकते.  

Web Title: Coronavirus: Corona Vaccine blocks third wave of coronavirus in Mexico, death rate drops by 80%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.