शहरं
Join us  
Trending Stories
1
चांदी २०% प्रीमियमवरही मिळेना; ऑनलाइन भाव अडीच लाखांवर
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑक्टोबर २०२५: कामात यश मिळेल, आर्थिक लाभ होईल अन् आत्मविश्वासही वाढेल!
3
‘घोटाळ्याच्या १५ वर्षांनी घेतला अनिल पवारांनी पदभार; ईडीकडे पुरावा नाही’
4
सॅटेलाईट आधारित टोल यंत्रणा लांबणीवर, ऑपरेशन सिंदूरमुळे घेतला निर्णय...
5
गुजरातमध्ये भाजपचे धक्कातंत्र; सर्वच्या सर्व १६ मंत्र्यांचे राजीनामे
6
मोठे यश! शास्त्रज्ञांनी बनवली 'युनिव्हर्सल किडनी'; रुग्णाचा कोणताही रक्तगट असुदे, प्रत्यारोपण करता येणार
7
मतपत्रिकांचा पर्याय आहे पण; आयोगाकडे मतपेट्याच नाहीत, युती सरकारनेच केली होती तरतूद
8
देशभर ऑनलाइन जुगारावर बंदी घालण्याची मागणी; सर्वोच्च न्यायालयात आज जनहित याचिकेवर सुनावणी 
9
ट्रम्प म्हणाले, ब्रेकिंग न्यूज देऊ का? रशियाचे तेल घेणे भारत थांबवणार   
10
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी आम्हाला पुरेसे मनुष्यबळ द्या!
11
रेल्वे प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ कॉलवरून केली प्रसूती; थ्री इडियट्ससारखा चमत्कार
12
मालकाच्या मृत्यूनंतर नऊ दिवस लोटले, कुत्रा स्मशानभूमीतच थांबून...
13
देशात शिक्षण, परदेशात सेवा! टॉप-१०० आयआयटीयनपैकी ६२ जणांचा परदेशी ओढा
14
अमेरिकेत रिपोर्टिंगवर निर्बंध; पत्रकारांनी सोडले पेंटागॉन, ॲक्सेस बॅज केले परत 
15
‘एनडीए’चे २३७ उमेदवार जाहीर; प्रचाराला चढला रंग
16
रेकी झाली... टार्गेट ठरले... पण लूट दुसऱ्याच दुकानात, तीन मित्रांच्या पहिल्याच चोरीचा शेवट पोलिस कोठडीत
17
कुंभमेळा आयोजनाची कामं नियोजित वेळेत पूर्ण झाली पाहिजेत; मुख्य सचिव राजेश कुमारांचे निर्देश
18
VIDEO: बापरे !! महाकाय अजगराने महिलेच्या पायाला घातला विळखा, महिलेचे धाडस पाहून सारे थक्क
19
Kaps Cafe Firing: कपिल शर्माच्या कॅफेवर पुन्हा गोळीबार; बिश्नोई टोळीच्या गोल्डी-सिद्धूने घेतली हल्ल्याची जबाबदारी

Coronavirus : कोरोनाचा हाहाकार! जगभरात तब्बल 82,156 जणांचा मृत्यू; इटली, स्पेनमध्ये परिस्थिती गंभीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2020 14:19 IST

Coronavirus : अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

कोरोनाने संपूर्ण जगाला विळखा घातला आहे. जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 82,156 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 14,34,825 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 3,02,468 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. इटलीत कोरोनामुळे सर्वाधिक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीत 17,127 लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर तब्बल 135,586 लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. इटलीनंतर स्पेनमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले असून स्पेनमधील एकूण मृत्यूची संख्या 14,045 वर गेली आहे. कोरोनामुळे  चीनमध्ये 3,333, अमेरिकेत 12,857, स्पेनमध्ये 14,045, इराणमध्ये 3,872, फ्रान्समध्ये 10,328, जर्मनीमध्ये 2,016 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

भारतात आतापर्यंत 150 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 5000 हून अधिक  झाली आहे. तर दुसरीकडे महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. अमेरिकेतील कोरोनाबधितांचा आकडा चार लाखांहून अधिक झाला आहे. अमेरिकेतील परिस्थिती दिवसेंदिवर कोरोनामुळे गंभीर होत चालली आहे. अमेरिकेत गेल्या 24 तासांत कोरोनामुळे दोन हजार लोकांचा मृत्यू झाला.

स्पेनमध्ये कोरोनामुळे रोज होणाऱ्या मृत्यूचा आकडा पुन्हा एकदा वाढला असून मंगळवारी तेथे तब्बल 743 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येथे कोरोनामुळे मरणाऱ्यांचा आकडा आता 14,045 वर पोहोचला आहे. या देशात कोरोनाने असे रुप धारण केले आहे, की जिकडे-तिकडे केवळ मृतांचा ढीग दिसत आहे. 'ला अल्मुडेना' ही या देशातील सर्वात मोठी स्मशानभूमी आहे. ही स्मशानभूमी माद्रिद येथे आहे. या स्मशानभूमीत दर 15 मिनिटाला कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एका व्यक्तीवर अंत्यसंस्कार केला जात असल्याचे चित्र आहे. या अंत्यसंस्कारासाठी 5 हून अधिक व्यक्तींना उपस्थित राहण्याची परवानगी नाही. इटलीनंतर स्पेनला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. इटलीनंतर येथेच सर्वाधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : बापरे! लॉकडाऊनमध्ये दुधाच्या कॅनमधून नेत होता दारुच्या बाटल्या अन्

CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांची संख्या ५१४९वर पोहोचली, १४९ जणांचा मृत्यू

CoronaVirus: 14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार; १५ पासून देशात काय काय बदलणार?

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतItalyइटलीGermanyजर्मनीchinaचीनAmericaअमेरिकाFranceफ्रान्स