Coronavirus: China refuses to discuss Corona at UN Security Council pnm | Coronavirus: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कोरोनावर चर्चा करण्यास चीनचा नकार; भारताने सुनावलं

Coronavirus: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत कोरोनावर चर्चा करण्यास चीनचा नकार; भारताने सुनावलं

ठळक मुद्देजागतिक समस्येवर महत्त्वपूर्ण सूचना आणि पर्यायांवर एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहेजागतिकीकरणामुळे प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून आहेतसर्वांनी एकत्र येऊन कोरोनासारख्या महामारीचा मुकाबला करायला हवा

नवी दिल्ली – संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट उभं राहिलं असताना आतापर्यंत १० लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर ५९ हजारांहून अधिक रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र ज्या कोरोना व्हायरसची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून झाली त्याचा फटका आता चीनपेक्षाही इतर देशांना जास्त बसत आहे.

कोरोना व्हायरसबाबत चीनला एक ना एक दिवस जगाला माहिती द्यावीच लागेल. आपण एका वैश्विक जगात राहत आहे. जागतिक समस्येवर महत्त्वपूर्ण सूचना आणि पर्यायांवर एकमेकांशी चर्चा करणे गरजेचे आहे असं भारताचं प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांनी सांगितले. जगातील सर्व देश कोरोनाविरोधात संघर्ष करत आहे. आंतरराष्ट्रीय संस्था एकमेकांना सहकार्य करत काम करत आहेत. कोरोनाच्या संकटाशी सामना करण्यासाठी जागतिक बँकेकडून आर्थिक सहाय्य मिळत आहे.

संयुक्त राष्ट्र परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व करणारे सैय्यद अकबरुद्दीन यांची इंडिया टुडेने मुलाखत घेतली. यापूर्वी आलेल्या रिपोर्टनुसार चीनने संयुक्त राष्ट्र परिषदेत वुहान आणि कोरोनाबाबत चर्चा करण्यासाठी नकार दिला आहे. मार्च महिन्यात चीनकडे १५ सदस्यीय सुरक्षा परिषदेचे अध्यक्षपद होते. यावर सैय्यद अकबरुद्दीन म्हणाले की, सुरक्षा परिषदकडे अजेंडा असतो. आतापर्यंत हा मुद्दा पटलावर न आल्याने यावर कोणतीही कमेंट करु शकत नाही. ही अनौपचारिक चर्चा आहे, आज नाहीतर उद्या यावर चर्चा होईल असं ते म्हणाले.

तसेच आपण एका वैश्विक जगामध्ये राहतो. जागतिकीकरणामुळे प्रत्येक देश एकमेकांवर अवलंबून आहेत आणि जागतिकीकरणाची प्रक्रिया विना अडथळा सुरु राहण्यासाठी जगाच्या हितासाठी प्रत्येक देशाने सहकार्य करणे आवश्यक आहे. प्रत्येक देश जगाच्या चांगल्यासाठी प्रय़त्न करत असतो. जगावर परिणाम होत असलेल्या मुद्द्यांशी संबंधित माहिती आणि तथ्ये जागतिक स्तरावर सामूहिक चर्चेत यावीत त्यावर उपाय शोधले जावेत असं मत सैय्यद अकबरुद्दीन यांनी मांडले. दरम्यान, कोणालाही दोष देण्याची ही वेळ नाही, परंतु तरीही सर्वांनी एकत्र उभे राहून मानवी अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या महामारीविरोधात लढण्याची गरज आहे असंही ते म्हणाले.

पारदर्शक आणि वैज्ञानिक मार्गाने चर्चा झाली पाहिजे

सय्यद अकबरुद्दीन म्हणाले की कोरोना विषाणू नावाच्या या साथीला जर समजावून घ्यायचे असेल तर आपण पारदर्शक, वैज्ञानिक पद्धतीने आणि मोकळेपणाने हा प्रश्न समजून घ्यावा लागेल. एक वेळ येईल जेव्हा आपण या संकटावर मात करू, आता आपल्या अस्तित्वाला आव्हान देणाऱ्या या आजाराशी लढा देण्याची गरज आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Coronavirus: China refuses to discuss Corona at UN Security Council pnm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.