coronavirus: airborne coronavirus possible: WHO | coronavirus: हवेद्वारे कोरोनाचा संसर्ग शक्य : डब्ल्यूएचओ

coronavirus: हवेद्वारे कोरोनाचा संसर्ग शक्य : डब्ल्यूएचओ

जेनेवा : जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) काही पुराव्यांच्या आधारावर कोरोनाचा संसर्ग हवेद्वारे होऊ शकतो. मात्र त्यावर आताच शिक्कामोर्तब करणे शक्य नाही़, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी वैज्ञानिकांच्या एका गटाने आरोग्य संघटनेला श्वसनाचे आजार लोकांमध्ये कसे पसरतात, याविषयी माहिती दिली होती.
दरम्यान, डब्ल्यूएचओच्या कोविड १९ साथीच्या तांत्रिक विभागाचे नेतृत्व करणाऱ्या मारिया व्हॅन केरखोव्ह म्हणाल्या, हवेद्वारे कोरोनाचा होणारा संसर्ग आणि ऐरोसोल प्रसारण यापैकी एखाद्या पद्धतीने संक्रमण यावर आम्ही विश्लेषण करत आहोत.
आरोग्य संघटनेने यापूर्वी म्हटले होते की, कोरोनाचा विषाणू मुख्यत्वे संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या नाक आणि तोंडातून काढून टाकलेल्या लहान थेंबांमधून पसरतो़ जेनेव्हा येथील क्लिनिकल संसर्गजन्य जर्नलमध्ये सोमवारी प्रकाशित खुल्या पत्रात ३२ देशांतील २३९ शास्त्रज्ञांनी म्हटले आहे की, हवेमध्ये तरंगणारे विषाणूचे कण श्वास घेणाºया लोकांमध्ये संक्रमण करू शकतात़ कारण श्वासाद्वारे बाहेर टाकलेले कण हवेत रेंगाळतात़ त्यामुळे शास्त्रज्ञ आरोग्य संघटनेला त्यांच्या मार्गदर्शक धोरणांमध्ये बदल करण्याचा आग्रह करत आहेत़
जेनेवा येथे आरोग्य संघटनेच्या तांत्रिक संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाच्या बेनेडेटा अल्लेंग्रजी म्हणाल्या, कोरोनाचे संक्रमण हवेद्वारे होत असल्याचे पुरावे मिळत आहेत़ परंतु, त्यावर आताच शिक्कामोर्तब करणे शक्य नाही़ सार्वजनिक ठिकाणी विशेषत: गर्दीच्या ठिकाणी, जिथे हवा कमी आहे आणि बंद ठिकाणी हवेद्वारे कोरोनाचे संक्रमण होऊ शकते़ त्यासंदर्भात पुरावे गोळा करून अवलोकन करणे आवश्यक आहे़

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: coronavirus: airborne coronavirus possible: WHO

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.