शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

CoronaVaccine News : आनंदाची बातमी! भारतात तयार होणार १ अब्ज लसी; चीनला दणका देण्यासाठी अमेरिकेचं मोठं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 19:38 IST

CoronaVaccine News & Latest Updates : १ अब्ज कोरोना लसींचं उत्पादन भारतातच करण्याचं लक्ष्य या परिषदेच्या निमित्तानं ठेवलं जाणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.

(Image Credit- ABC News )

जानेवारीपासून कोरोना व्हायरसविरुद्ध लसीकरण मोहिम सुरू झाली. त्यानंतर लोकांमध्ये दिलासादायक वातावरण पाहायला मिळालं. पण दिवसेंदिवस कोरोनाच्या प्रसाराचा  धोका वाढत असल्यामुळे पुन्हा लोकांच्या मनात लॉकडाऊन आणि कोरोनाच्या उद्रेकाची धास्ती आहे. यामुळेच लसीकरणाच्या मोहिमेचा वेगही वाढवला आहे. भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी होऊ घातलेल्या क्वाड शिखर परिषदेत भारतासाठी दोन सकारात्मक बातम्या येण्याची शक्यता आहे. 

भारत जगाच्या लस उत्पादनाचं केंद्र बनू शकते. त्यासाठी अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन स्वतः पुढाकार घेणार असून जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीचं उत्पादन भारतात करण्यासंदर्भातील सुरूवात होण्याची शक्यता आहे. याशिवाय जगासाठी अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या तब्बल १ अब्ज कोरोना लसींचं उत्पादन भारतातच करण्याचं लक्ष्य या परिषदेच्या निमित्तानं ठेवलं जाणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांकडून समोर आलेल्या माहितीनुसार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन चीनच्या आक्रमतेला पर्याय उभा करण्याबाबत कुठलाही आड पडदा न ठेवता बोलणार आहेत. आज संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, ऑस्ट्रेलियाचे पतंप्रधान स्कॉट मॉरीसन, जपानचे पंतप्रधान सुगा आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन ऑनलाईन शिखर परिषदेत सामील होणार आहेत. साधारपणे ९० मिनिटांच्या या बैठकीत चीनच्या दक्षिण चीन समुद्रातील वाढती आक्रमकता, भारत-चीन सीमेवर वाढता तणाव, याविषयावर खुल्या दिलानं चर्चा होणार असल्याचं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे.

दुसऱ्या टप्प्यात सरकारला स्वस्त मिळाली कोरोनाची लस

जसजसी देशभरात कोरोना लसीची मागणी वाढत आहे. त्याचप्रमाणे उत्पादनही वाढत आहे.  उत्पादन वाढल्यामुळे कोरोना लसीची किंमतही कमी करण्यात आली आहे. आता सरकारकडून दुसऱ्या टप्प्यातील कोविशिल्डची (Covishield) ची ऑर्डर दिली आहे. त्यातील एक डोसची किंमत १५० रूपये आहे. पण ५ टक्के जीएसटीसुद्धा (Goods and Service Tax)  द्यावा लागणार आहे. म्हणजेच लसीच्या एका डोसची किंमत १५७.५० रुपये इतकी असेल. याआधी जानेवारीमध्ये ऑर्डर देण्यात आली होती.  त्यावेळी लसीच्या एका शॉटची किंमत २१० रूपये इतकी होती.

सर्वाधिक महिला होताहेत कोरोना लसीच्या साईड इफेक्ट्सच्या शिकार; सीडीसीचा संशोधनातून खुलासा 

कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात लसीच्या डोसची ऑर्डर वाढलेली आहे. याचा फायदा सगळ्यांनाच मिळाला आहे.  आरोग्य मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी इकोनॉमिक्स टाईम्सला दिलेल्या माहितीनुसार लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात जी ऑर्डर देण्यात आली आहे. त्यात किमतीत सुट मिळाली आहे. 

हे आहे जगातील सर्वात महाग औषध, १८ कोटी रूपयांच्या एका डोजने दूर होणार दुर्मीळ आजार...

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियानं या टप्प्यातील एका डोसचे वितरण १५० रूपयांमध्ये करण्यासाठी सहमती दर्शवली आहे. त्यात ५ टक्के जीएसटीसुद्धा लागणार आहे.  म्हणजेच लसीच्या एक डोसची किंमत १५७.५० रूपये असेल. ही किंमत जगभरातील इतर लसींच्या तुलनेत कमीत कमी असल्याचे  सांगितले जात आहेत. या टप्प्यात  किती शॉट्सची ऑर्डर दिली आहे. याबाबत माहिती समोर आलेली नाही.

टॅग्स :AmericaअमेरिकाchinaचीनIndiaभारतCorona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्या